आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मराठवाडा साहित्य परिषदेचे 2021 चे ग्रंथपुरस्कार जाहीर,  मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले पुरस्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांतून पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेले २०२१ चे ग्रंथपुरस्कार बुधवारी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहिर करण्यात आले.

या पुरस्कारांमध्ये नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कारासाठी बीड येथील अॅड. विजय जावळे यांच्या " लोकमात ' कादंबरीची निवड करण्यात आली. प्राचार्य म.भि. चिटणीस वाड्मय पुरस्कार नागपूरच्या डॉ.प्रमोद मुनघाटे यांच्या "अठराशे सत्तावन आणि मराठी कादंबरी ' या समीक्षा ग्रंथासाठी जाहिर करण्यात आला. कै.कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कारासाठी पुणे येथील देवा झिंजाड यांच्या " सगळं उलथवून टाकलं पाहिजे ' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तर बी रघुनाथ कथा,कादंबरी पुरस्कारासाठी सोलापूर येथील संतोष जगताप यांच्या " विजेने चोरलेले दिवस ' या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. तर कुमार देशमुख नाट्यपुरस्कारासाठी औरंगाबादचे डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या "साल्मन' या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे स्वरुप रुपये तीन हजार राख आणि शाल श्रीफळ असे आहे. तसेच रा.ज. देशमुख स्मृतिपुरस्कार हा मराठी पुस्तक व्यवहारात हयातभर लक्षणीय स्वरुपाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस देण्यात येतो. २०२१ च्या पुरस्कारसाठी मुंबईच्या ग्रंथाली वाचक चळवळ या संस्थेची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठीची ग्रंथनिवड ही प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने केली असून या समितीत डॉ.सुरेश सावंत, डॉ. ज्ञानदेव राऊत हे सदस्य होते. रा.ज.देशमुख स्मृतिपुरस्काराची निवड ज्येष्ठ प्रकाशक के.एस. अतकरे, जीवन कुलकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या समितीने केली आहे. हे पुरस्कार लवकरच समारंभपूर्वक देण्यात येतील. जर काही अडचण अथवा अडथळा आला तर सर्व पुरस्कार हे पोस्टाने घरपोच पाठविण्यात येतील असेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...