आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात विश्वासरावांनी गणित बिघडवले:शिक्षक मतदार संघात तिरंघी लढत; काळे-पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक टेबल वरती 1000 मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. 56 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या पसंतीचे मतदान मोजण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात अनपेक्षितरित्या सूर्यकांत विश्वासराव यांच्या वाढत्या मतामुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत.

विक्रम काळे, सूर्यकांत विश्वासराव आणि किरण पाटील या तिन्ही उमेदवारांमध्ये फार अंतर नसल्याचे सांगण्यात येत आहे. कधी विश्वासराव आघाडी घेत आहेत तर कधी विक्रम काळे आणि पाटील. त्यामुळे कोणाला किती मते पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्ह्यांत एकूण 53 हजार 257 मतदारांनी मतदान केले आहे. सध्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अपक्ष उमेदवार तसेच मराठवाडा शिक्षण संघटनेचे सूर्यकांत विश्वासराव यांना मोठ्या प्रमाणात आघाडी असल्याची चर्चा मतमोजणी केंद्र परिसरात ऐकायला मिळत आहे. हा प्राथमिक टप्प्यातला कल असला तरी सूर्यकांत विश्वासराव यांची वाढती मते निवडणुकीच्या निकालाची सर्व गणिते बिघडून टाकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

काळे-पाटील यांचे गणित

माजी आमदार विक्रम काळे आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांची गणिते बिघडवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दोन तासापासून पहिल्या पहिल्या पसंतीची मते मोजण्याचे काम सुरू असून आणखी दोन ते तीन तास पहिल्या पसंतीची मते मोजण्यासाठी लागू शकतात.​​​​​​

दुसऱ्या पसंतीची मते कोणाला?

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक टेबलवर सूर्यकांत विश्वासराव यांना मते मिळत असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक वाढत जाणारी मते दोन्ही उमेदवारासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या ही निवडणूक तिरंगी होत असून दुसऱ्या पसंतीची मते कोणाला मिळणार यावरच विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...