आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शिक्षक मतदार संघात दुसऱ्या पसंती वरच लागणार निकाल:विक्रम काळे यांना सर्वाधिक 20078 मते

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंती वर विजयासाठी 25 हजार 386 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र एकाही उमेदवाराला हा कोटा निश्चित करता आला नाही. विजयासाठीची आवश्यक मते न मिळाल्यामुळे आता दुसऱ्या पसंतीनुसार मतमोजणी सुरू करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे.

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक टेबल वरती 1000 मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. 56 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या पसंतीचे मतदान मोजण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात अनपेक्षितरित्या सूर्यकांत विश्वासराव यांनी आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाली आहे.

मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये 2485 मध्ये ही बाद झाली आहेत. सध्या विक्रम काळे यांना सर्वाधिक 20078 मते मिळाली आहेत तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना 13489 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार मराठवाडा शिक्षक संघटनेचे उमेदवार असलेले सूर्यकांत विश्वासराव यांना 13543 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे कालिदास माने यांना 1043 आणि मनोज पाटील यांना 1090 मते मिळाली आहेत.

विजय दुरावला

मराठवाडा शिक्षक संघ विजयाच्या मार्गावर होता मात्र मतदानाच्या दोन दिवसा अगोदर आमच्या मतदारांवर मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांकडून दबाव टाकण्यात आला. पैशाचे अमिष दाखवण्यात आले. संस्था चालकाकडून धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे जो आमचा विजय निश्चित होता तो आमच्यापासून दुरावला गेला. अशी प्रतिक्रिया मराठवाडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली आहे.

कोण बाजी मारणार?

नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...