आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडची मराठवाडा शिक्षक, अमरावती पदवीधर लढण्याची तयारी:उद्धवसेनेशी चर्चा करून उमेदवार निश्चित करणार : डॉ. भानुसे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा, अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने सुरू केली आहे. उद्धवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून उमेदवार जाहीर केले जाणार आहेत. सध्या मराठवाडा मतदारसंघासाठी सहा जण इच्छुक आहेत. त्यापैकी एक मी असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

ब्रिगेडने आगामी सर्व निवडणुका लढवण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. त्या दृष्टीने अध्यक्ष अॅड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभ खेडेकर यांनी केंद्रीय बैठकीत मराठवाडा शिक्षक आणि अमरावती पदवीधरमध्ये लढण्याचे निश्चित केले आहे. ६० हजारांवर शिक्षक मतदारांची नोंदणी केली आहे, उद्धवसेनेचा निर्णय बुधवारपर्यंत कळेल. तुम्ही स्वत: औरंगाबादेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का, असा प्रश्न विचारला असता, पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर निवडणूक लढेन व जिंकेनही, असे ते म्हणाले. या वेळी जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अॅड. वैशाली कडू, रवींद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे आदी उपस्थित होते.

शिक्षकांसाठी लढा उभारू अनुदानित कॉलेज, विद्यालयातील शिक्षकांना मतदान व निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हजारो प्राथमिक शिक्षक या मतदान प्रक्रियेतून वंचित राहत आले आहेत. संभाजी ब्रिगेड लढा उभारेल, असे भानुसेंनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...