आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील तहसीलदार, नायब तहसीलदारांचा एल्गार:ग्रेड पे वाढविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात ग्रेड पे वाढवण्यासाठी विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. यामध्ये सर्व जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदारांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग - 2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. मात्र, नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -2 चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच यासंदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरून अद्यापही देण्यात आलेली नाही.

संघटनेनी नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे रुपये 4800/- मंजूर करण्याचे अनुषंगाने शासनाला या पूर्वी ही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. मात्र, महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही. तत्कालीन अपर मुख्य सचिव व महसूल मंत्री व वित्त मंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे.

टप्या टप्याने केले जाते आंदोलन

यावर तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष किरण आंबेकर म्हणाले की . के. पी. बक्षी यांचे अध्यक्षते खालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष बाबींची सर्व माहिती असूनही व वारंवार निवेदन देवूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे 4800/- करणे बाबतच्या सादर केलेल्या मागणीची दखल न घेतल्यामुळे मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमिका स्वीकारण्याचा एकमताने निर्णय संघटनेव्दारे घेण्यात आला.

त्यानुसार टप्पेनिहाय आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर 13 मार्च सर्व तहसीलदारांनी आंदोलन केले असून तीन एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे आम्ही सांगितले.

- किरण आंबेकर, विभागीय अध्यक्ष, तहसीलदार संघटना

बातम्या आणखी आहेत...