आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा अन् सतर्कता:रुग्णसंख्या घटतेय, रिकव्हरी वाढतेय; पण कोरोना हद्दपारीसाठी सावधगिरी महत्त्वाची

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यातील रिकव्हरीचा दर 96.85; रुग्णसंख्याही होतेय कमी

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हाहाकार माजवणारा कोरोना धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे. राज्यातील काही जिल्हे वगळता इतरत्रही स्थिती सुधारत आहे. मराठवाड्यात तर सर्वच जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. मृतांचा आकडाही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूप कमी झाला आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून प्रशासन तयारीला लागले असले तरी आणखी काही महिने नियमांचे तंतोतंत पालन केले आणि लसीकरण वेगाने झाले तर लवकरच मराठवाड्यातून कोरोना नाहीसा होण्यास वेळ लागणार नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

मराठवाड्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाने अक्षरश: थैमान घातले. मार्च ते मेदरम्यान स्थिती खूप वाईट होती. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. पण जूनच्या मध्यानंतर रुग्ण कमी कमी व्हायला लागले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यातही रुग्ण जास्त आढळत आहेत. नांदेड जिल्ह्यात मात्र झपाट्याने रुग्णसंख्या कमी झाली असून येथे मृतांची व पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसते. औरंगाबाद जिल्ह्यातही दिलासादायक स्थिती आहे. येथेही रुग्णसंख्या कमी झालेली आहे.

बीड : दरराेज साडेचार हजार चाचण्या होताहेत
सध्या बीड जिल्ह्यात दरदिवशी चार ते साडेचार हजार चाचण्या हाेत असून पाॅझिटिव्ह रुग्णही १०० ते १५० च्या आसपास सापडत अाहेत. जिल्ह्यात पाॅझिटिव्हिटी दर ५ टक्के अाहे. १६ सीसीसी, ३८ डीसीएचसी, ४५ डीसीएच सध्या सुरू अाहेत.

नांदेड : जिल्ह्यामध्ये दोन वेळा रुग्णसंख्या शून्यावर
दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या जास्त असल्याने अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग होती. पण आता नगण्य रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात दोन वेळा एकही रुग्ण सापडला नाही. जिल्ह्यात जवळपास १५९६ गावात एकही रुग्ण नाही.

हिंगाेली : २२ पैकी २० सेंटर तात्पुरते केले बंद
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ०.३८ एवढा आहे. सध्या २२ कोविड केअर सेंटरपैकी २० सेंटर तात्पुरते बंद करण्यात अाले अाहेत. हिंगोली व कळमनुरी येथील प्रत्येकी एक सेंटर सुरू आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सुरूवातीपासूनच येथे कमी रुग्ण आहेत.

परभणी : जिल्ह्यात एका सेंटरवर उपचार सुरू
जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्क्यापेक्षाही कमी अाहे. जवळपास १५ काेविड सेंटरपैकी एका सेंटरमध्येच रुग्णांवर उपचार सुरू अाहेत. जिल्ह्यातील ८४८ गावांपैकी या १२ दिवसांत शहरासह इतर ९ गावांत रुग्ण आढळले.

उस्मानाबाद : पॉझिटिव्हिटी दर ४.४१ टक्क्यांवर
जिल्ह्यात रिकव्हरी दर ९५ टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात ५७९ गावांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. सध्या रुग्ण कमी असल्याने जवळपास ३० सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाॅझिटिव्हिटी रेट ४.४१ टक्क्यांवर अाहे.

लातूर : शासकीय काेविड सेंटर आजही आहेत सुरू
जिल्ह्यात अातापर्यंत ७ लाख १ हजार १२ तपासण्या करण्यात अाल्या. त्यापैकी ९१ हजार ६७३ रुग्ण पाॅझिटिव्ह अाढळले. सध्या जिल्ह्यात शासकीय काेविड सेंटर सुरूच ठेवण्यात अाले अाहेत. रुग्णांची संख्याही कमी झाली अाहे.

अाैरंगाबाद : शहरात दोनच कोविड सेंटर सुरू
जुलैअखेर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्के आहे. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.५० टक्के आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने शहरातील बहुतांश कोविड सेंटर तात्पुरते बंद केले असून केवळ मेल्ट्रॉन व पदमपुरा येथील कोविड सेंटर सुरू ठेवण्यात आले आहेत.

जालना : ५ जुलैला एकही रुग्ण आढळला नाही
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जिल्हा असल्याने येथे सुविधा निर्माण झाल्या. आता मृतांचा आकडाही कमी आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ०.२४ इतका आहे. ५ जुलै रोजी येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...