आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भात नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असले तरी पाऊस कोसळला नाही. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात दाट धुके पसरले, तर मराठवाडा हा थंडीने गारठला होता. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली असली तरी उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारवा कायम आहे. शुक्रवारी राज्यात सर्वात कमी ११.७ अंश सेल्सियस तापमान औरंगाबाद शहरात नोंदवण्यात आले.
अफगाणिस्तानातून २ फेब्रुवारीला दुसरा पश्चिमी चक्रावात आल्याने उत्तर भारतात हिमवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडून वारे वाहत असल्याने पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये थंडी वाढली. महाराष्ट्रातही वाऱ्यांमुळे किमान व कमाल तापमानात सरासरीपेक्षा अशंत: घट झाली.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी दाट धुके निर्माण झाले होते. त्यामुळे कांदा, गहू, द्राक्ष या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात प्रमुख शहरांतील किमान तापमान
औ.बाद ११.७
महाबळेश्वर११.८
नाशिक १२.३
पुणे १३.१
सातारा १३.१
वर्धा १३.२
सांगली १३.४
नांदेड १३.८
बीड १४.०
सोलापूर १४.०
परभणी१४.४
जळगाव१४.८
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.