आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससी निकाल:केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठवाड्याचा डंका, पहिल्याच प्रयत्नात बीडचा मंदार पत्की राज्यात तिसरा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीडच्या 5 भूमिपुत्रांचा डंका

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदा मराठवाड्यातील १४ जणांनी बाजी मारत साऱ्यांनाच सुखद धक्का दिला आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले. यात एकट्या बीड जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबादेतील तीन, उस्मानाबाद दोन, नांदेड, जालना व परभणीतील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. निकाल जाहीर होताच विविध जिल्ह्यांत आनंदोत्सव साजरा केला.

बीडच्या ५ भूमिपुत्रांचा डंका

यूपीएससी परीक्षेत यंदा प्रथमच बीड येथील पाच भूमिपुत्रांनी चमकदार कामगिरी केली. यात मंदार जयंतराव पत्की याने पहिल्या प्रयत्नात यशाला गवसणी घालून २२ वी रँक, जयंत मंकले यानेही अंधत्वावर मात करत १४३ रँक, डॉ. प्रसन्ना रामेश्वर लोध याने ५२४ रँक, अंबाजोगाईच्या विद्युतनगरातील रहिवासी असलेला वैभव वाघमारे ७७१ वी रँक तर श्रेणीक दिलीप लोढा याने २२१ रँक मिळवत यशाला गवसणी घातली आहे.

मंदारने पुणे येथून अभियांत्रिकी पदविका व पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अवघ्या २३ व्या वर्षी त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली, त्याला २२ वी रँक मिळाली आहे. जयंतनेही अंधत्वावर मात करत नेत्रदीपक यश मिळवले. यंदा त्याने १४३ वी रँक मिळवली आहे. २०१८ मध्ये वैभवने लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दिली होती पुढे सप्टेंबर २०१९ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्याला हे यश मिळाले. डाॅ. प्रसन्ना याने ५२४ रँक मिळवत यश संपादन केले. श्रेणीक याची रँक २२१ आली आहे.

मराठवाड्यातील हे १४ यशवंत

१. मंदार पत्की : २२ - बीड

२. योगेश पाटील बावणे ६३ - नांदेड

३. जयंत मंकले : १४३ - बीड

४. कुणाल चव्हाण २११- परभणी

५. सुमीत महाजन २१४- औरंगाबाद

६. श्रेणीक लोढा : २२१-बीड

७. नेहा किर्दक ३८३ - औरंगाबाद

८. डॉ. प्रसन्न लोध ५२४- बीड

९. अंकिता वाकेकर ५४७ - औरंगाबाद

१०. आशित कांबळे ६५१ - उस्मानाबाद

११. अक्षय भोसले : ७०४ जाफराबाद (जालना)

१२. नीलेश गायकवाड ७५२ -उस्मानाबाद

१३. वैभव वाघमारे ७७१ -(अंबाजोगाई) बीड

१४. अभिजित वायकोस ५९० -जाफराबाद (जालना )

बातम्या आणखी आहेत...