आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:औरंगाबाद साखर कारखान्यांविरोधात शेट्टींच्या नेतृत्वात पुण्यात सोमवारी मोर्चा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही साखर कारखाने उतारा चोरी करतात, गाडीच्या वजनात काटा मारतात, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर संकुलावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेट्टी यांनी बीड जिल्ह्यातील एका सभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील २०० साखर कारखान्यांचे वजन-काटे ऑनलाइन करा, या प्रमुख मागणीसाठी हा धडक मोर्चा आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील म्हणाले की, यापुढे मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा दाम मिळून घ्यायचे असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येने राहिले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...