आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:मार्च दोन अंशांनी अधिक तापणार; फेब्रुवारीही 3 अंशांनी अधिक उष्ण होता

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात साधारणत: मार्चमध्ये जे तापमान असते, त्यामध्ये या वेळी सामान्य तापमानापेक्षा १ ते २ अंश सेल्सियस जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. येथे तापमान एक अंश ते दोन अंश सेल्सियस अधिक राहील. मुख्यतः चक्रीवादळ आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या किरकोळ परिणामामुळे मार्च महिन्यात तापमान सामान्यपेक्षा १ ते २ अंश सेल्सियस जास्त राहण्याची शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तापमान सामान्यपेक्षा ३ अंश सेल्सियस जास्त होते.

मार्च, एप्रिल आणि मे हे महिने हवामान बदलाचे ऋतू आहेत. मार्च-मे महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता अधिक आहे. वाऱ्याच्या पॅटर्ननुसार लोकांना उष्णतेच्या लाटेबद्दल दोन ते तीन दिवस अगोदर इशारा दिला जाईल. एक किंवा दोन अंश सेल्सियसची वाढ सामान्य मानली जाते, परंतु ४ अंशांपेक्षा जास्त वाढ ही उष्णतेची लाट मानली जाते.

मराठवाडा : किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार पुढील २ दिवस फारसा बदल होणार नाही. ३ ते ५ मार्च : किमान तापमान २-३ अंशांनी हळूहळू वाढ होणार. पुढील ४-५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. पुढील २ दिवसांत विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल नाही. पण त्यानंतर विदर्भात २-३ अंश सेल्सियसने वाढेल. पुढील ५ दिवसांत विदर्भात किमान तापमानात मोठा बदल होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...