आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव वाढले:गणपती, ज्येेष्ठा गौरीत प्रतिकिलो 40 ते 50 रुपयांपर्यंत घसरलेले झेंडूचे दर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयादशमीच्या दिवशी घरोघरी झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. त्यासाठी पिवळ्या, केशरी रंगाच्या फुलांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मात्र ज्येष्ठा गौरी सणाच्या दिवशी ४० ते ८० प्रतिकिलो तर गणेश विसर्जनापूर्वी अगदीच १० ते २० रुपये किलो दराने विक्री होणाऱ्या झेंडूचा भाव दसऱ्याच्या पूर्वसंध्येला १०० ते १५० रुपयांपर्यंत वधारला होता.

दसऱ्याच्या दिवशी दारावर फुलांची तोरणे बांधण्याची कित्येक वर्षांपासून परंपरा आहे. या दिवसांत फुलांचा बहरण्याचा काळ असतो. झेंडूच्या पिवळा आणि केशरी रंगाचे सर्वांनाचे आकर्षण असते. या फुलांना पिवळा, केशरी, सोनरी रंग असल्यामुळे शुभ मानले जाते. या फुलांची आरास केली जाते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आसपासच्या गावांतून तब्बल ८ हजार क्विंटल आवक झाली आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत पावसाचा तडाखा सुरू असल्याने शेतात बहराला आलेली फुले पावसामुळे सडली. उत्पादन कमी झाले. औरंगाबादच्या जाधववाडी, सिटी चौक येथील फुलबाजारात जटवाडा, फुलंब्री, पोखरी, गोपाळपूर, खोडेगाव, कन्नड, करंजखेडा, हतनूर, कालीमठ, वानेगाव, त्यासोबतच जालना, बीड, गेवराई, हिंगोली आणि अहमदनगर या भागातून आवक होत असते. यंदा हिंगोलीसह इतर ठिकाणी पाऊस झाल्याने कमी फुले आली. आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत. होलसेल बाजारात ७० ते ८० रुपये तर किरकोळ बाजारात १०० ते १५० रुपये किलोप्रमाणे विक्री मंगळवारी होत होती. यात अश्वगंधा, पितांबरी, गोल्डस्पॉट २, यलो एक्स्प्रेस, कलकत्ता या प्रकारच्या जाती आहेत. पिवळ्या, केशरी फुलांना जास्त मागणी आहे.

पावसामुळे फुलांचे नुकसान
सप्टेंबरच्या मध्यात पडलेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले. मागील वर्षी ४०-५० रुपयांनी शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला. मात्र अचानक आवक वाढल्याने रेट १० रुपये किलोवर आले होते. यात व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. यंदा फुलांच्या भावात तेजी असून १०० ते १५० रुपये विक्री होत आहे.
- कृष्णा बनकर, होलसेल फूल विक्रेते

अपेक्षित उत्पादन निघाले नाही
आम्ही एक एकरमध्ये झेंडू लावला. यातून ८ ते १० क्विंटल उत्पादन निघेल अशी अपेक्षा होती. पण फक्त ३ क्विंटल फुले निघाली. शेवंती अर्धा एकरमध्ये ३५ ते ४० किलो निघाली. पावसामुळे फुलांवर पाणी थांबून ती काळी पडली. यामुळे नुकसान झाले.
- संदीप हरणे, शेतकरी, पोखरी

बातम्या आणखी आहेत...