आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसह सासरच्यांवर गुन्हा:बहीण, भाच्याने केला विवाहित मुलीचा छळ; जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीचे पहिले लग्न मोडल्यानंतर दुसरे लग्न करताना बहिणीच्या घरात दिल्यास ती नीट सांभाळ करेल, या अपेक्षेने वडिलांनी बहिणीच्या मुलासोबत मुलीचे लग्न लावले. मात्र लग्नाच्या काही महिन्यांमध्येच तिचा सासरी छळ सुरू झाला. मुलापासून लांब केले. अखेर त्रासलेल्या २५ वर्षीय अरबी विषयाच्या शिक्षिकेने आत्महत्या केली. आल्फिया परविना असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिचा पती शेख हामेद हमीद्दोदिन ताबा (४७, रा. फाजलपुरा) याच्यासह चैघांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल केला. फसीयोद्दीन शेख (५६) यांनी हे मनपा शाळेत शिपाई आहेत. त्यांना तीन मुली आहे. त्यातील आल्फियाचे २०२० मध्ये आरोपीशी लग्न झाले. बाळंतपण होईपर्यंत सासरच्यांनी तिला व्यवस्थित सांभाळले. त्यादरम्यान दीड वर्ष ती माहेरीच होती.

मात्र पुन्हा सासरी जाताच तिला बाळाला लांब केले. अनेक दिवस बाळाला तिच्याकडे देत नव्हते. सोबत शारीरिक मानसिक त्रास सुरू झाला. त्यामुळे अल्फिया दिवसेंदिवस खचत गेली. तिच्या वडिलांनी तिला सासरी जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या सासूने सख्ख्या भावालाच ‘तुला नेहमी नेहमी यायचे असल्यास मुलीलाच तुझ्या घरी घेऊन जा’ असे बजावले हाेते.

स्वतंत्र खोलीत बंदिस्त केले एका कौटूंबिक कार्यक्रमात भेटल्यानंतर पीडिताने वडिलांना सर्व घटना सांगितली. आल्फियाला सासू व पतीने तिसऱ्या मजल्यावर छोट्या खोलीत राहायला सांगितले. बाळाला मात्र भेटू दिले जात नव्हते. कधीतरी बाळाला भेटू देतील या आशेने अल्फिया तेथे राहत होती. ‘सतत तू कशाला जिवंत राहतेस मरून जा’ असे म्हणून तिला मारहाण देखील सुरू झाली. या त्रासाला कंटाळून अल्फियाने अखेर २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...