आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:भिवपूर येथील शहीद जवान गणेश संतोषराव गावंडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भोकरदनएका वर्षापूर्वीलेखक: महेश देशपांडे
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भिवपुर येथील शहीद जवान गणेश संतोषराव गावंडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी नातेवाईक, ग्रामस्थ तालुक्यातील प्रतिष्टित मंडळी मोठ्या संख्येने हजर होती .

सोमवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान पुणे येथे सेवा बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यात त्यांचे निधन झाले होते. बुधवारी औरंगाबाद येथून त्यांचे पार्थिव भारतीय सैन्यदलाच्या वाहनातून त्यांच्या मूळ गावी भिवपूर येथे सकाळी सात वाजेला आणण्यात आला.

त्यांचा पार्थिव देह गावात येण्याअगोदर गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करून त्यांच्या पार्थिव देहाच्या रथाचे दर्शन घेतले व गावातून अंत्ययात्रा काढली.

गावातील नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी जाणारा मार्ग देखील सुशोभित केला. अंत्यसंस्कार कार्यक्रमाचे नियोजन करून विशेषतः भिवपूर येथील तरुणांनी एक वेगळा आदर्श या निमित्ताने दाखवून दिला. गावाच्या जवळ असलेल्या त्यांच्याच शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक दिवस अगोदरच अंत्यसंस्काराची जागा सुशोभित करून त्याठिकाणी मंडप उभा करण्यात आला होता. त्यांचा पार्थिव देह घेऊन आलेले नायब सुभेदार विजय हवालदार हवालदार प्रकाश काळे विलास नाईक गीलानी शेख माजी सैनिक संघटनेचे हवालदार विठ्ठल जगताप हवालदार बाळू तायडे यांच्यावतीन सैनिकी रीतीरिवाजाप्रमाणे त्यांना मानवंदना देऊन पोलिस प्रशासनाकडून देखील फैरी झाडून त्यांना सलामी दिली.

या वेळी त्यांची पत्नी व दोन मुलांनीदेखील त्यांना सलामी देताच सर्व उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांनी बेळगाव येथे ट्रेनिंग घेऊन पंधरा वर्षे मराठा बटालियन इन्फंट्री मध्ये देश सेवा केली. त्यांनी श्रीनगर राजस्थान दिल्ली रामन व त्यानंतर त्यांची नुकतीच पुणे येथे पोस्टिंग करण्यात आली होती. त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घालून या वीर पुत्राला हिरावून घेतल्याने भिवपूर गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

यावेळी अध्यात्म भूषण ह भ प संतोष महाराज आढावणे, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह-भ-प अजबराव महाराज मिरगे, प्रादेशिक सेना व सैनिक संघटनेचे विठ्ठल जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मुठे, जिल्हा परिषद सदस्या सौ. आशा पांडे, किशोर गावंडे सरपंच रतन गावंडे यांनी आपल्या शब्द सुमनांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. व शेवटी सर्व उपस्थित जनसमुदायाच्या वतीने एकत्र अखेरची श्रद्धांजली वाहून शहीद गणेश गावंडे यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील तसेच प्रशासनातील विविध अधिकारी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...