आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामसिआतर्फे आयोजित टी-20 क्रिकेट स्पर्धेत राहुल पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर (58 धावा, 4 बळी) कंम्बाइन शेंद्रा संघाने मोठा विजय मिळवला. गरवारे स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत शेंद्राने बजाज संघावर 72 धावांनी मात केली. या लढतीत राहुल पाटील सामनावीर ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कंम्बाइन शेंद्राने 18 षटकांत 5 बाद 162 धावा उभारल्या. यात कर्णधार संदीप खोसरेने 27 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 31 धावा केल्या. सलामीवीर राहुल पाटीलने शानदर अर्धशतक झळकावले. त्याने 44 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 58 धावा काढल्या. गत सामन्यात सामनावीर ठरलेला संदीप तुपे (7) विशेष कामगिरी करू शकला नाही. प्रविण नागरेने 25 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचत 44 धावा ठोकल्या. बजाजकडून दीपक कुमार व आकाश पगारेने यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, बाजाज संघ 18 षटकांत 7 बाद 90 धावा करू शकला. यात कर्णधार सागर तळेकरने 56 चेंडूंत 66 धावा काढल्या. त्याला इतर एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही. त्यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. शेंद्राच्या राहुल पाटीलने अवघ्या 5 धावा देत 4 फलंदाज तंबूत पाठवले. संदीप तुपेने 2 बळी घेतले.
प्रोनेक्स एमआर इलेव्हनने महावितरणला हरवले
दुसऱ्या लढतीत प्रोनेक्स एमआर इलेव्हन संघाने महावितरण संघावर 6 गडी राखून मात केली. प्रथम खेळताना महाविरतणने 20 षटकांत 7 बाद 135 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात एमआरने 15.1 षटकांत 4 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात अदनान अहेमदने 40, कय्युमने 49, सइद फरहानने 28 धावा केल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.