आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसिआ टी 20 क्रिकेट:ग्रामीण पोलिस संघाचा विजय; सीएसएमसी संघाला हरवले

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मसिआच्या वतीने आयोजित औद्योगिक टी 20 क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण पोलिस संघाने शानदार विजय मिळवला. गरवारे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ग्रामीण पोलिसांनी सीएसएमसी ब संघावर 8 गडी राखून मात केली. या लढतीत विशाल नरवडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सीएसएमसीने 20 षटकांत 9 बाद 128 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात ग्रामीण पोलिस संघाने 14.2 षटकांत 2 गडी गमावात 132 धावा करत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर शुभम हरकळने 13 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकार खेचत 29 धावा काढल्या. जुनैदने सचिन भालेरावच्या हाती त्याला झेल बाद केले. दुसरा सलामीवीर विशाल नरवडेने 25 चेंडूंत 8 सणसणीत चौकार लगावत सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. अजय हिवराळेने त्याचा त्रिफळा उडवला. यष्टिरक्षरक अविनाश मुकेने 28 चेंडूंत 1 चौकारासह नाबाद 20 धावा केल्या. विजय जाधवने 20 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचत नाबाद 29 धावांचे योगदान दिले. अमित टाक 22 धावा देत सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

सीएसएमसीची फलंदाजी ढेपाळली

तत्पूर्वी, सीएसएमसीकडून सलामीवीर विशाल धुमाळने 38 चेंडूंत 6 चौकार मारत सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. कर्णधार संदीप जाधवने त्याला धावबाद करत अडथळा दुर केला. दुसरा सलामीवीर अमित टाकने 13 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार लगावत 19 धावा दिल्या. कर्णधार सचिन भालेरावने 17 आणि लखन दुलजालने 13 धावा केल्या. तळातील फलंदाज अजय हिवराळेने नाबाद 15 धावा जोडल्या. पोलिसांकडून विजय जाधवने 2 गडी बाद केले. संजय सपकाळ, विशाल नरवडे, श्रीकांत तळेगावने यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.