आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामसिआतर्फे आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत गरवारे स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात ग्रामीण पोलिस संघाने कंम्बाइन बँकर्स संघावर ६ गडी राखून मात केली. या लढतीत इशांत राय सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना बँकर्सने २० षटकांत ९ बाद १२५ धावा उभारल्या. यात आकाश बोराडेने १९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ३० धावा केल्या. निखिल मुरूमकरने १८, इंद्रजीत उढाणने १३, सुरज फासेने १७ धावा केल्या. अष्टपैलू हरमितसिंग रागीने ३३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३३ धावांची खेळी केली. पोलिसांकडून इशांत रायने १४ धावा देत ४ गडी बाद केले. विजय जाधवने २ व विकास नगरकरने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरात ग्रामीण पोलिसांनी १८ षटकांत ४ गडी गमावत १२६ धावा करत विजयी लक्ष्य गाठले. यात विकास नगरकरने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूंत ७ चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. अविनाश मुळेने नाबाद २९ धावांचे योगदान दिले. इशांत राय ७ धावांवर नाबाद राहिला. बँकर्सकडून हरमितसिंग रागी आणि निखिल मुरूमकरने प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले.
शहर पोलिस विजयी, सुदर्शन सामनावीर
दुसऱ्या सामन्यात शहर पोलिस संघाने महानगरपालिका अ संघावर ५६ धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना शहर पोलिसांनी १८ षटकांत ६ बाद १८० धावा उभारल्या. यात प्रदीप जगदाळेने ५२ आणि अजय काळेने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रदीप व अजय जोडीने पहिल्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. राहुल जोनवाल ३६ धावांवर नाबाद राहिला.
मनपाकडून हर्ष कीर्तिकरने ३ व अल्ताफ खानने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात मनपा संघ निर्धारित षटकांत ८ बाद १२४ धावा करु शकला. राजेश कीर्तिकरने ४७ व हर्ष कीर्तिकरने ४५ धावा काढल्या. पोलिसांकडून सुदर्शन एखंडेने ४ व जलानी शेखने २ बळी घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.