आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसिआ टी-20 क्रिकेट स्पर्धा:मसिआ इलेव्हन संघ विजयी, हितेश पटेल ठरला सामनावीर, सणसणीत चौकार-षटकारांनी रंगला सामना

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आयोजित मसिआ औद्योगिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मसिआ इलेव्हन संघाने विजय मिळवला. गरवारे क्रीडा संकुलावर हा सामना झाला. या सामन्यात मसिआ संघाने कंम्बाइन इंडस्ट्रीज शेंद्रा संघावर 8 गडी राखून मात केली. या लढतीत हितेश पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कंम्बाइन इंडस्ट्री शेंद्राने 20 षटकांत सर्वबाद 142 धावा केल्या. यात सलामीवीर राहुल पाटीलने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 57 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचत सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. मात्र, संघाच्या पराभवामुळे त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. दुसरा सलामीवीर प्रविण नागरे अवघ्या 4 धावांवर परतला.

कर्णधार संदीप खोसरेने 24 चेंडूंत 6 चौकारांसह 38 धावा काढल्या. पवन कावळेने 13 धावा जोडल्या. ओंकार ठाकुर शुन्यावर बाद झाला. ओंकार मोगल 9 धावा करु शकला. इतर फलंदाजांनी निराशा केली. मसिआकडून हितेश पटेलने भेदक गोलंदाजी करत 27 धावा देत 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने एक षटक निर्धावही टाकले. धर्मेंद्र पटेलने 2 आणि मधुर पटेलने एकाला टिपले.

आदर्श जैनचे अर्धशतक :

प्रत्युत्तरात मसिआ इलेव्हनने 16.1 षटकांत 2 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात संघाची सुरूवात खराब झाली. स्फोटक सलामीवीर म्हणून ओखळ असलेला यष्टिरक्षक फलंदाज मुकीम शेख अवघ्या 3 धावांवर परतला. मोहन सखाराम भुमरेने राहुल पाटीलच्या हाती त्याला झेल बाद केला.

दुसरा सलामीवीर ऋषिकश तरडेने 24 चेंडूंत 3 चौकार खेचत 28 धावा केल्या. आदर्श जैनने नावाप्रमाणे ‘आदर्श’ खेळी केली. त्याने 46 चेंडूंचा सामना करताना 8 सणसणीचा चौकार लगावत नाबाद 67 धावांची विजयी खेळी केली. मधुर पटेलने फटकेबाजी करत 16 चेंडूंत 2 चौकार व 4 उत्तुंग षटकार मारत नाबाद 37 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. शेंद्राकडून मोहन भुमरे व कर्णधार संदीप खोसरे यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...