आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामसिआतर्फे गरवारे स्टेडियमवर आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए अ संघाने शहर पोलिस ब संघावर ६ धावांनी विजय मिळवला. या लढतीत मुकुल जाजू सामनावीर ठरला. रविवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत कंम्बाइन बँकर्स संघाने महानगरपालिका अ संघावर ४ गडी राखून मात केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डीबीएने १६ षटकांत ३ बाद १३४ धावा उभारल्या. यात सलामीवीर तथा यष्टिरक्षक फलंदाज मुकुल जाजून शानदर अर्धशतक झळकावले. त्याने ४१ चेंडूंत ५ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचत ६५ धावांची खेळी केली. उल्हास खरात ८ व राकेश कुलकर्णी ९ धावांवर परतले. कर्णधार मोहित घाणेकरने १५ चेंडूंत १ चौकार व २ षटकारासह नाबाद २७ धावा काढल्या. हरिओम काळेने ७ चेंडूंत नाबाद १६ धावा ठोकल्या. पोलिसांकडून धीरज थोरातने ३२ धावा देत २ गडी बाद केले. सचिन मिरधेने एकाला टिपले.
प्रत्युत्तरात, शहर पोलिस निर्धारित षटकांत ५ बाद १२८ धावा करू शकले. यात सलामीवीर इम्रान पटेलने ११ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार लगावत २९ धावा केल्या. पंकज दळवीने २१, धीरज थोरातने २३ आणि विजय पंडुरेने नाबाद ३० धावा काढल्या. डीबीएकडून संतोष भारती व रिजवान शेखने प्रत्येकी २ गडी बाद केले.
आकाश बोराडे ठरला सामनावीर
दुसऱ्या सामन्यात कंम्बाइन बँकर्सने मनपाला हरवले. नाणेफेक जिंकून बँकर्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना मनपाने १८ षटकांत ४ बाद ११५ धावा केल्या. आकाश बोराडेने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात बँकर्सने १२.३ षटकांत ५ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात अष्टपैलू आकाश बोराडेने २८ आणि इंद्राजित उढाणने नाबाद ४३ धावा काढल्या. संदीप राजपूतने १३ धावा जोडल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.