आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसिआ टी-२० स्पर्धा:मसिआ ब संघाचा गुड इअरवर एकतर्फी विजय, विश्वजीत राजपूत, निकित चौधरीचे अर्धशतके

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या मसिआ टी-20 क्रिकेट स्पर्धेत मसिआ ब संघाने गुड इअर संघावर 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. या लढतीत विश्वजीत राजपूत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुड इअरने 20 षटकांत 7 बाद 146 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात मसिआ ब संघाने 13.4 षटकांत 1 गडी गमावत 147 धावा करत विजय साकारला. यात सलामीवीर जोडीने शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. सलामीवीर निकित चौधरी व विश्वजीत राजपूतने अर्धशतके झळकावली. निकितने 39 चेंडूंत 10 चौकार खेचत 64 धावांची खेळी केली. वैभव जठार स्वत:च्या गोलंदाजीवर झेल बाद केले. दुसरा सलामीवीर विश्वजीतने ४२ चेंडूंचा सामना करताना 11 सणसणीत चौकार व 2 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 73 धावांची विजयी खेळी केली. निकित व विश्वजीत जोडीने पहिल्या गड्यासाठी 81 चेंडूंत 142 धावांची शतकी भागीदारी केली. रोहन शाह 4 धावांवर नाबाद राहिला. गुड इअरच्या अनिकेत मिश्राने 4 षटकांत सर्वाधिक 39 धावा देत सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

वैभवची अष्टपैलू खेळी व्यर्थ

तत्पूर्वी, गुड इअरच्या वैभव जठारने अर्धशतक झळकावे. परंतू संघाच्या पराभवामुळे त्याची अष्टपैलू खेळी व्यर्थ ठरली. वैभवने एकाकी लढत देत 57 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचत सर्वाधिक 78 धावा ठोकल्या. दुसरा सलामीवीर सिराज मिर्झाने 10 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. कर्णधार सुनील जाधवच्या 16 धावा वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मसिआकडून विश्वजीत राजपूतने 14 धावा देत 2 गडी बाद केले. श्रेयस बनसोड, निलेश जाधव व शुभम मोहितने प्रत्येकी एक एक गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...