आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालय:मसिआचे चिकलठाण्यात 20,000 चौरस फुटांचे नवे कार्यालय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या (मसिआ) ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त १ सप्टेंबरला वाळूज आणि चिकलठाणा कार्यालयात रक्तदान शिबिर झाले. या वेळी वाळूजमध्ये ४०, तर चिकलठाण्यात ११४ जणांनी रक्तदान केले. मागील २० वर्षांत मसिआने अडीच हजारांहून अधिक रक्तदान घडवून आणत सामाजिक दायित्व निभावले आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मसिआच्या चिकलठाणा येथील नव्या वास्तूच्या उद्घाटनाचे नियोजन आहे. साडेसात कोटींच्या या वास्तूत ऑडिटोरियमसह कार्यालय उभारण्यात आले आहे.

वर्धापन दिनानिमित्त सहकारमंत्री अतुल सावे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष अनिल पाटील आणि भगवान राऊत उपस्थित होते. वास्तू उभारणीसाठी देणगी दिलेल्या मोठ्या ७ आणि लहान ७९ उद्योजकांचा सत्कारही करण्यात आला. या वेळी सीएमआयए अध्यक्ष नितीन गुप्ता, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, मानद सचिव अर्पित सावे, औरंगाबाद फस्टचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, मसिआचे माजी अध्यक्ष अभय हंचनाळ, राहुल मोगले, दुष्यंत आठवले उपस्थित होते.

मूलभूत सुविधांची मागणी
जगताप म्हणाले, १ सप्टेंबर १९७७ रोजी ९ उद्योजकांनी मसिआची स्थापना केली. आज १२५० उद्योजक सहभागी आहेत. एमआयडीसीत रस्त्यांची वानवा आहे. वारंवार पाठपुरावा करूनही गट नंबरमध्ये असलेल्या उद्योगांना रस्ते, पाणी, ड्रेनेज या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. सवलतही दिली जात नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सहा महिन्यांत उद्योगांचे प्रश्न मार्गी लावतो : सावे
उद्योजकांच्या समस्यांची मला जाणीव आहे. रस्ते एमआयडीसीने करावेत की मनपा या वादात उद्योजक भरडले जात आहेत. आगमी सहा महिन्यांत हा वाद संपवून रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावेन, असे आश्वासन सावेंनी दिले.

बातम्या आणखी आहेत...