आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Mass National Anthem Will Be Held On August 9 15 Thousand Students Will Sing National Anthem, Presentation Of Cultural Programs At Divisional Sports Complex

9 ऑगस्टला होणार सामूहिक राष्ट्रगीत:विभागीय क्रीडा संकुल येथे 15 हजार विद्यार्थी गाणार, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शासन विविध उपक्रम घेत आहे. त्याच अनुषंगाने 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या अनुषंगाने विभागीय क्रीडा संकुल येथे शहरातील 15 हजार विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करणार असून त्यानंतर सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी दिली.

दुसर्‍या महायुद्धात पाठिंबा घेऊन सुद्धा ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले नाही. तेव्हा महात्मा गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची हाक दिली. हा स्वातंत्र्यासाठीचा अंतिम लढा होता. 'चले जाव' आणि 'करेंगे या मरेंगे' हे दोन स्फूर्तिदायक मंत्र या लढ्याने दिले. या आंदोलनाची सुरुवात 9 ऑगस्ट 1942 रोजी झाली होती. त्यामुळेच हा दिवस ऑगस्ट क्रांतिदिन म्हणून पाळला जातो.

सामूहिक राष्ट्रगीत गायन

मुंबईच्या ज्या गवालिया टँक मैदानातून या आंदोलनास सुरुवात झाली. त्याचेच औचित्य साधून 15 हजार विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे. सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

घर तिरंगा मोहिमेसाठी जनजागृती

या बरोबरच शाळा आणि ग्रामीण भागातील प्रतिनिधींनी देखील स्थानिक पातळीवर कार्यक्रम घ्यावा. हर घर तिरंगा मोहिमेसाठी जनजागृती करावी असे गटणे यांनी सांगितले आहे. यानिमित्ताने विद्यार्थी काही देखावे देखील सादर करतील. हा सर्व कार्यक्रम सुरळीत व्हावा. सर्वांनी यात उत्साहाने सहभागी व्हावे. यासाठी सर्व विभागातील अधिकारी, पदाधिकारी प्रयत्न करत असून बैठका देखील घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांकडून शाळांमध्ये सराव देखील केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...