आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएचएसजे स्टेडियमवर सुरू असलेल्या मास्टर ट्रॉफी 2022 स्पर्धेत संग्राम परिहारच्या (68 धावा, 5 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मास्टर क्रिकेट क्लबने जाधव इलेव्हन संघावर 16 धावांनी विजय मिळवला. या मालिकेत मास्टर सीसी 3-0 ने आघाडीवर आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मास्टर संघाने 40 षटकात सर्वबाद 264 धावा उभारल्या. यात सलामीवीर इरफान पठाणने अर्धशतकी खेळी केली. त्याने 27 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार व 3 षटकार खेचत 81 धावा काढल्या. विवेक बोर्डेने 18, यश जैस्वालने 12, ए.के. खानने 15 धावा केल्या. तळातील फलंदाज संग्राम परिहारने अर्धशतक झळकावले.
संग्रामने 72 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह 68 धावा केल्या. आवेश खानने 11 आणि शेखर पटेलने 21 धावा जोडल्या. जाधव इलेव्हनकडून यश खरबेने 3 आणि संतोष मुधवरने 2 बळी घेतले. मंगेश बोडखे, साहिल, सुहास उजगरे यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
अष्टपैलू विवेकचे अर्धशतक व्यर्थ
प्रत्युत्तरात जाधव इलेव्हन संघाचा डाव 43.5 षटकांत 248 धावांवर संपुष्टात आला. यात एकाकी लढत देणाऱ्या अष्टपैलू विवेक घुगेची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. तर मास्टरच्या विजयात संग्राम परिहारने 5 गडी बाद करत माेलाचे योगदान दिले. सलामीवीर महेश राठोडेने 56 चेंडूत 42 धावा केल्या. संतोष मुधवरने 33 चेंडूंत 33 धावा काढल्या. विवेकने 70 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचत सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. मास्टरच्या अश्विन जाधवने 2 व मो. कैफने एकाला बाद केले. संग्रामने 50 धावांत 5 फलंदाज तंबूत पाठवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.