आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट:मास्टर्स सीसी संघाला विजेतेपद

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचएसजे मैदानावर झालेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत मास्टर्स सीसी संघाने विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये मास्टर्सने प्रोफेशनल क्रिकेट अकादमी अ संघावर ७४ धावांनी विजय मिळवला.

विजेत्या संघाला प्रशिक्षक संदीप जाधव यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले. प्रथम खेळताना मास्टर्सने ४०.४ षटकांत सर्वबाद २६९ धावा उभारल्या. यात सलामीवीर इरफान पठाणने सर्वाधिक ४९ धावा काढल्या. त्याने ३१ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकार खेचले. यश जैस्वालने ११ व एस. काकडेने ५ धावा केल्या. अब्दुल रकिबने २२, संग्राम परिहारने २७, विवेक बोर्डेने ३१ आणि ए. के. खानने २८ धावा काढल्या. तळातील फलंदाज प्रतीक गोमटेने १४ आणि अष्टपैलू कुणाल माहिपालने १७ धावा जोडल्या. प्रोफेशनलचा गोलंदाज के. पी. शाश्वतने ६० धावा देत पाच गडी बाद केले. त्याचबरोबर वरद नागापूरकर आणि रोहन पंडितने प्रत्येकी दोन फलंदाज तंबूत पाठवले.

रुद्राक्षचे अर्धशतक व्यर्थ प्रत्युत्तरात प्रोफेशनलचा डाव ४६.५ षटकांत १९५ धावांवर संपुष्टात आला. मधल्या फळीतील रुद्राक्ष बोर्डेने ५६ धावा केल्या. त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. राघव नाईकने १५, अमेय बुजबळने ३०, अभिराम गोसावीने २६ धावा केल्या. संग्राम परिहार व मो. अलीने प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...