आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामास्टर्स संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय जलतरण व अॅथलेटिक्स मास्टर्स गेम्समध्ये शानदार कामगिरी करत सिमा वर्मासह औरंगाबादच्या राजेश पाटील, सतिश यादव, मंगल सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेत यजमान औरंगाबाद व मुंबईच्या खेळाडूंनी पहिल्या दिवशी वर्चस्व राखले. या स्पर्धेत ३० ते ७० वर्षापुढील वयोगटातील ३५० वरिष्ठ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत अॅथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, सायकलिंग व वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
स्पर्धेचे उद्घाटन छावणीचे सीईओ संजय साेनवणे व विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दयानंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव बाळू चव्हाण, स्पर्धा सचिव मुकेश बाशा, कॅटिनो डिसल्वा, प्रभाकर रुमाले, सुनिल जाधव, प्रभाकर दुबे, महेंद्र बारगजे आदींची उपस्थिती होती.
मास्टर्स खेळाडू तरुणांसाठी प्रेरणा : सोनवणे
या स्पर्धेत सर्व वरिष्ठ गटातील खेळाडू सहभागी झाले आहेत. या वयातही मैदानावरील तुमची जिंकण्यासाठीची जिद्द व मेहनत वाखण्याजोगी आहे. तरुणांना लाजवेल असा तुमच्यातील उत्साह पाहून खुप आनंद वाटतोय. तुम्ही सर्व मास्टर खेळाडू तरुण पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत आहात. तुम्हाला पाहुन नातवंडासारखी मुले मैदानाकडे वळतील. त्यातुनच एक निरोगी पिढी तयार होईल व सशक्त देश तयार होईल, असे मत छावणी परिषदेचे सीईओ संजय सोनवणे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :
४० वर्षावरील महिला ५००० मीटर धावणे - सिमा वर्मा, पालघर (प्रथम), मंगला बागुल, नाशिक (द्वितीय), ५० वर्षावरील गट - शिल्पी मंडल (पालघर), मंगल दळवी (मुंबई). ५५ वर्षावरील गट - आरती गायकवाड (ठाणे). पुरूष ४० वर्षावरील गट - मगंल सिंग (औरंगाबाद), अरुण मोरे (पालघर), परेश वैद्य (पालघर). ५० वर्षावरील गट - सतिश यादव (औरंगाबाद), विनोद जांगिड (मुंबई). पुरुष भालाफेक ५० वर्षावरील गट - राजेश भोसले (औरंगाबाद), सत्यवान एन. राव (मुंबई), अनिल इंगळे (बुलडाणा).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.