आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टर्स ट्रॉफी 2023:चॅम्पियन्स संघ ठरला मास्टर्स ट्रॉफीचा विजेता; शहर पोलिस संघ उपविजेता

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्टर्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित 25 वर्षे वयोगटावरील मास्टर्स ट्रॉफी 2023 बास्केटबॉल स्पर्धेत अत्यंत रोमांचक अंतीम लढतीत चॅम्पियन्स संघाने शहर पोलिस संघाला अवघ्या एका गुणांनी हरवत विजेतेपद पटकावले. शहर पोलिस संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत सर्वोउत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम गवळी याला गौरवण्यात आले.

स्वर्गीय प्रभाकरजी पांडे क्रीडांगण विद्युत कॉलनी, बेगमपुरा येथे झालेल्या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला 7777 रुपये व चषक आणि उपविजेत्या संघाला चषक व 4444 रुपये बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल झळके पाटील, आदित्य दहिवाळ, कुंदन रेड्डी, रोमी छाबडा आणि श्रीकांत बेलकर यांची उपस्थिती होती. स्पर्धेचे आयोजन मास्टर्सच्या प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, संदीप ढंगारे आदींनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संदीप ढंगारे यांनी केले.

सनी, महेश, शुभम, संदीपची चमकदार कामगिरी

फायनलमध्ये चॅम्पियन संघाने शहर पोलिस संघावर 69 विरुद्ध 68 अशा एका पॉईंटने निसटता विजय संपादन मिळवला. तिसऱ्या सत्रपर्यंत शहर पोलिस संघ आघाडीवर होता, परंतु चौथ्या सत्रामध्ये स्टॅमिनाच्या अभावी चॅम्पियन संघातील शुभम गवळी आणि सनी फतेलष्कर यांनी आपल्या उंचीचा आणि ताकदीचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघाला बढत मिळवून दिली. महेश इंगळेने 2 आणि संदीप ढंगारेने 1 थ्री पॉइंटर मारून संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.

शहर पोलिस संघाकडून विजय पिंपळेने एकाकी खिंड लढवत शेवटच्या 17 सेकंदामध्ये थ्री पॉइंटर मारत स्पर्धेत थरार आणत बास्केटबॉल प्रेमींचे हृदयाचे ठोके वाढवले. आकाश खोलवालने सुरेखा फास्ट ब्रेक केले तर विजय गाडे आणि सोनू खरात यांनी उंचीचा फायदा घेत उत्कृष्ट रिबाउंडर घेतले. शुभम गदई याने चपळ खेळ करत चँम्पियनला विजयी केले.