आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बद्रीनाथहून मनमीत:गर्भगृहातील माता लक्ष्मी... भगवान बद्रीनाथांना तुपाची चादर पांघरून मंदिराची द्वारे बंद

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारधामपैकी एक बद्रीनाथचे कपाट अर्थात द्वार हिवाळ्यामुळे शनिवारी बंद करण्यात आले. तत्पूर्वी भगवान बद्रीनाथांना महिलांच्या वतीने तयार केलेल्या तुपाची चादर पांघरण्यात आली. मुख्य पुजाऱ्यांनी स्त्रीवेश धारण करून माता लक्ष्मीची मूर्ती गर्भगृहात स्थापन केली. यानंतर उद्धव व कुबेरांच्या मूर्ती मंदिरात आणण्यात आल्या. यासोबतच पहाटे ३.५५ वाजता बद्रीनाथ मंदिराचे द्वार हिवाळ्यासाठी बंद करण्यात आली.

दुसरीकडे देशातील अंतिम गाव म्हणून ओळख असलेल्या माणा गावचे लोक बर्फवृष्टीमुळे सहा महिन्यांसाठी गाव सोडून खालील गावांकडे निघतात. आदिवासी जमातींचा हा हिवाळ्यातील सर्वात दीर्घ अंतराचा प्रवास असतो.

बातम्या आणखी आहेत...