आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसमतमध्ये चोरट्यांची हद्द:थेट क्वारंटाईन सेंटरमधूनच साहित्य पळविले, तपासणीच्या कामासाठी पोलिसांनाही जाता येईना

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • घटनास्थळ पंचनाम्याची अडचण

वसमत येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्येच चोरट्यांनी चोरी करून पोलिस प्रशासनासोबतच आरोग्य अन महसुल विभागालाही आव्हान दिले आहे. या ठिकाणावरून चोरट्यांनी वॉटर फिल्टर, बेडसीट, बकेट असा २१ हजार रुपयांचा ऐवज पळविला. या प्रकरणी शुक्रवारी ता. २२ रात्री उशीरा वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वसमत तालुक्यात बाहेरगावाहून येणाऱ्या मजूर व गावकऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे विद्यार्थीनी वसतीगृह ताब्यात घेण्यात आले आहे. या ठिकाणी बेड, स्वच्छतागृहामध्ये बकेट, हँन्डवॉश, शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहे. या शिवाय उन्हाळ्यामुळे उकाड्याचा त्रास होऊ नये या साठी पंखे देखील बसविण्यात आले.

दरम्यान, १२ मे पुर्वी या ठिकाणी २० ते २५ गावकऱ्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांनासुट्टी देण्यात आली. १२ मे ते ता. १७ मे या कालावधीत या ठिकाणी कोणीही नव्हते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी क्वारंटाईन सेंटरट्या एका खोलीच्या खिडकचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यातील वॉटर फिल्टर, पाच पंखे, पाच बेडसीट, पाच बकेट असा २१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.या क्वारंटाईन सेंटरच्या खिडकीचे ग्रिल तुटल्यामुळे १७ मे रोजी महसुल व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. मात्र वॉटर फिल्टर व बकेट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या केंद्राकडे नेले असावे असे गृहीत धरून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्या ठिकाणीही हे साहित्य नसल्याने शुक्रवारी ता. २२ रात्री उशीरा मंडळ अधिकारी प्रभाकर काळे यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.यावरून पोलिसांनी चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळ पंचनाम्याची अडचण

वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्याच्या स्थितीत ४० ते ४५ जण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता घटनास्थळ पंचनामा कसा करायचा असा प्रश्‍न वसमत पोलिसांसमोर उभा राहिला आहे. तर या प्रकाराने चोरट्यांनी एक प्रकारे पोलिस, महसुल अन आरोग्य विभागालाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...