आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाकडून दिव्यांगांना मिळणाऱ्या अनेक योजनांची अंमलबजावणी होत नाही. अनेक गरजवंत दिव्यांग साहित्याच्या प्रतीक्षेत असतात. मात्र शहरातील हाऊस ऑफ होप संस्थेच्या माध्यमातून ६० दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी गरजवंत रुग्णांसाठी साडेपाच लाख रुपयांच्या अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. कुबड्या-८, खुर्ची- ८, वॉकर- २०, छडी- ८ वाटप करण्यात आले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ‘हाऊस ऑफ होप’ या सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडीच्या समोर गरजू दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक असणारे विकलांग सायकल, व्हीलचेअर, वॉकर, हातकाठी यांच्यासह इतर साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, घाटीचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, माजी महापौर रशीद मामू, कीर्ती शिंदे, अभिजित देशमुख, ख्वाजा शरफोद्दीन, विजय साळवे आदींची उपस्थिती होती. या वेळी साडेपाच लाखांच्या अॅम्ब्युलन्स सेवेचे लोकार्पण केले.
शिबिरात ८७ जणांनी केले रक्तदान रक्तदान शिबिरांचे उद्घाटन आ. सतीश चव्हाण, आ. प्रदीप जैस्वाल आदींच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी एकूण ८७ दात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी द हाऊस ऑफ होप संस्थेचे मुख्तार खान, कय्युम शेख, किशोर वाघमारे, इरफान शेख, नवीद खान, झुबेरखान, रहेमत अली, नदीम कुरेशी, इरफान अली, सय्यद जफर, सचिन रसाळ, एजाज कुरेशी यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.