आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:कोविड केअर सेंटरमधील साहित्य गायब; चौकशी सुरू, याबाबत उपायुक्त सौरभ जोशी यांनी माहीती दिली

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड केअर सेंटरमधील कोट्यवधींचे साहित्य गायब झाल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाची चौकशी सुरू करण्यात आली. कोणत्या कोविड केअर सेंटरसाठी किती आणि कोणत्या प्रकारचे साहित्य मागवले होते, याची यादी चौकशी अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांकडून मागवली आहे. ही चौकशी ४ एप्रिलपासून सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत उपायुक्त सौरभ जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, चौकशीचे काम सुरू झाले आहे. कोणत्या कोविड केअर सेंटरला व क्वॉरंटाइन सेंटरला किती आणि कोणत्या प्रकारचे साहित्य दिले होते. याची यादी आरोग्य विभागाकडून मागवली आहे. प्राप्त होणाऱ्या यादीनुसार चौकशी करणार आहे. लवकरच चौकशी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार कोविड केअर सेंटर्स, क्वॉरंटाइन सेंटर्स सुरू केली होती. त्यांची संख्या २२ होती. प्रत्येक कोविड केअर सेंटर व क्वॉरंटाइन सेंटरसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आवश्यक साहित्य खरेदी केले होते. यात पलंग, गाद्या, उशा, बेडशीट, पिलोकव्हर, साबण, तेल, कंगवा, आरसा, कूलर्स, टीव्ही, आयुर्वेदिक काढ्यासाठीचे मशीन आदी साहित्याचा समावेश होता. पहिली लाट ओसरल्यावर यातील काही साहित्य गायब झाले. परंतु, प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट संपल्यानंतर मनपा प्रशासनाला साहित्य गायब झाल्याचे लक्षात आले. काही दिवसांपूर्वी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आढावा बैठक घेतली, तेव्हा सेंटर्समधील साहित्य गायब झाल्याचे उघड झाले होते. उपायुक्त सौरभ जोशी यांना चौकशी करण्याचे आदेश पांडेय यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...