आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर:जीवघेण्या खड्ड्यांमुळे रस्त्यातच मातेची प्रसूती; एक जीव उमलण्याआधी कायमचा कोमेजला

वैजापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयात नेताना गाडीत हादऱ्यांमुळे झाली प्रसूती, बाळ दगावले

रात्रीची वेळ आणि तीव्र प्रसूतिवेदना सुरू झाल्याने शिऊर बंगला येथून उपचारार्थ औरंगाबादच्या दिशेने खासगी वाहनातून निघालेल्या गर्भवतीची सोमवारी रात्री वाटेतच गारजजवळ प्रसूती झाली. कारण, रस्ताच इतका भयंकर की एक खड्डा चुकवता चुकवता दुसरा खड्डा समोर. गाडीत हादरे इतके बसले की रस्त्यातच बाळाने जन्म घेतला... पण बाळ दगावले आणि एक जीव उमलण्याआधीच कायमचा कोमेजला. शिऊर बंगला येथील समीर शेख यांच्या वाट्याला हे दु:ख आले.

शेख मूळ उत्तर प्रदेशचे. मोलमजुरी करण्यासाठी ते या भागात आले आहेत. पत्नी साजियाला प्रसूती वेदना होऊ लागल्याने त्यांनी तत्काळ औरंगाबादला हलवण्यासाठी खासगी वाहन केले. परंतु, रस्त्यांवरील खड्ड्यांनी घात केला. गारजजवळील झोलेगाव पाटीजवळ गर्भवतीची खड्ड्यामुळे प्रसूती झाली. परंतु वेळेवर रुग्णालय गाठता आले नाही. त्यामुळे बाळ दगावले. रात्री १ ते दीडच्या सुमारास जीवन-मरणाशी दोन हात करताना बाळाचा जीव वाचू शकला नाही, परंतु सुदैवाने पत्नी वाचली, एवढे समाधान मानून शेख व नातेवाइकांनीही पुढील प्रवास टाळून परतण्याचा निर्णय घेतला. या सर्वांच्या दु:खावेगासोबत संतापालाही पारावर राहिला नाही. या निमित्ताने रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न मात्र पुन्हा ऐरणीवर आला.

संताप आणि भीती
बाळ दगावल्याने कुटुंबीय प्रचंड संतापले होते. पत्नी सुरक्षित असल्याने आता दवाखान्यात जाऊन काय करायचे? शिवाय पुढे रस्तेमार्गही खडतर होता म्हणून पती समीर शेख कुटुंबीयांसह माघारी परतले.

बातम्या आणखी आहेत...