आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामातोश्री पाणंद रस्त्याची कामे जून पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांनी दिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात मातोश्री फायनल योजनेअंतर्गत 2900 किलोमीटरची कामे करण्यात येणार आहेत. याबाबत प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मराठवाड्यात मातोश्री पांनद योजनेअंतर्गत दहा हजार किमीची कामे करण्यात मातोश्री पाणंद योजना अंतर्गत या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून नियोजन केवळ कागदावरच दिसत असून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली नसल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. त्यानंतर याबाबत भुमरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध अधिकारी उपस्थित होते.
आणखी रस्ते मंजूर केले जातील
यावेळी चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद जिल्ह्यात मातोश्री पाणंद योजनेअंतर्गत 3000 किलोमीटरचे रस्ते करण्याचे नियोजन आहे. मात्र यामध्ये आवश्यकतेनुसार आणखी रस्ते वाढवून ते करण्यात येणार असल्याचे भूमरे यांनी सागितले. त्यांबाबतच्या सूचना देखील प्रशासनाला देण्यात आल्या असून आणखी 500 किमीचा रस्ते केले जातील असे त्यांनी सांगितले
मजूराची अडचण नाही
रोहयोची कामे करताना मजुरांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात आहेत. रोहयो मजुरांना मिळणारी मजुरी कमी आहे. त्यामुळे रोहयोच्या कामा बाबत संथ गती आहे. याबाबत भूमरे यांना विचारले असता मजुराची उपस्थितीची अडचण नसल्याचे भूमरे यांनी सागितले.
शेतकऱ्यांची कामे होत आहेत ते बघा
खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार वर मैत्र प्रकरणात बिल्डर नियुक्तीवरून टीका केली होती. त्यावर भूमरे म्हणाले की, हे सरकार बिल्डरचे नाही शेतकऱ्याचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना निधी देखील मिळत आहे. तसेच शेतकऱ्याची कामे देखील होत असल्याचे सांगत शेतकऱ्याचे सरकार असल्याची अशी टीका त्यांनी केली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.