आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना वॉरिअर:कोरोना रुग्णांना स्वतःच्या गाडीने रुग्णालयात पोहोचवणारा माऊली; म्हणाला- त्यांचा आशीर्वादच मला 12 हत्तींचे बळ देऊन जातो!

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना बाधित रुग्णासाठी सेवा देणारा देवदूत

बीड जिल्ह्यात खेड्या पाड्यातील कोरोना बाधित व्यक्तीला हॉस्पिटल आणि कोव्हिड सेंटरपर्यत स्वतःच्या गाडीने घेऊन जाणारा माऊली रुग्णासाठी देवदूत ठरला आहे. आत्तापर्यंत 200 लोकांना या माऊलीने जीवनदान दिले आहे. कोरोना पॉझिटिव्ह म्हटलं की गाडी मिळत नाही, मिळाली तरी दुप्पट तिप्पट भाडे मागितले जाते. यामुळे गरीब रुग्णाचे हाल होतात. यावर उपाय म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या माऊली सिरसाट या तरुणाने पुढाकार घेत कोव्हिड व्हॅन तयार केली. या व्हॅनने हा रुग्णांकडून एकही रुपयांची अपेक्षा न करता, हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तसेच, कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना त्यांच्या घरीदेखील सोडतो.

बीड जिल्ह्यातील पाडळी गावातील सामन्य शेतकऱ्यांचा मुलगा असलेला माऊली सिरसाट नावाचा तरुण, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोरोना रुग्णांची सेवा करतोय. खेड्यापाड्यात लोक दुखणे अंगावर काढतात, त्यातच लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने हॉस्पिटल पर्यत जायचे म्हटले तरी पंचाईत असते. यातच पॉझिटिव्ह पेंशट म्हटले की, भाडे दुप्पट तिप्पट मागितले जाते. यावर माउलीने गावातील नोकरदार मंडळींना एकत्रित करून त्यांच्या मदतीने कोव्हिड व्हॅन तयार केली.

सुरुवातीला फक्त गावातील लोकांना मदतीला येणाऱ्या माऊली आता तालुक्यामधील कुठल्याही गावात जाऊन रुग्णांना मदत करतो. गावात कोरना रुग्ण आढळला की माऊलीला फोन येतो आणि माऊली त्या रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जातो. इतकच नाही, तर त्यांची मुले पुणे-मुंबईला कामाला असतात त्यांच्यासाठीही माऊली धावून जातो आणि हॉस्पिटलला नेण्यासोबत कोरोनातून ठीक झाल्यानंतर घरी घेऊन येतो. त्यावेळी रुग्णांकडून माऊली तुझ्यामुळेच आज आम्ही जिवंत आहोत, हे शब्द मात्र माऊलीला काम करण्याचे बळ देतात. माऊलीच्या या कामाला गावातील नोकरदार वर्ग वर्गणी करून मदत करतो.

इनपुट - रोहित देशपांडे

बातम्या आणखी आहेत...