आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेसाठी कुणालाच पैसे दिले नाहीत:कितीही क्लिपा सोडा, आता दानवे-खैरेंच्या पायाखालची वाळू सरकली; संदीपान भुमरेंची टीका

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कितीही अफवा सोडा. कितीही क्लिपा सोडा. मात्र, आम्ही सभेसाठी कुणालाच पैसे दिले नाहीत. आता अंबादास दानवे-चंद्रकांत खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका सोमवारी मंत्री संदीपान भुमरे यांंनी केली. ते पैठणमधल्या सभेत बोलत होते.

महाविकास आघाडीत असताना मी फायली घेऊन मी अडीच वर्षे फिरत होतो. योजनेसाठी प्रयत्न करीत होतो, पण त्यांनी पैठणला निधी दिला नाही, असा आरोपही भुमरे यांनी केला.

शिदेंनी दोन हजार कोटी दिले

भुमरे म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ब्रह्मगव्हाण योजनेला 890 कोटी रुपयांचा निधी दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणला दोन हजार कोटींचा निधी दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी ब्रह्मगव्हाण सिंचन योजना मंजूर केली.

किती हा खोटारडेपणा...

भुमरे म्हणाले, रस्त्याने दुतर्फा कार्यकर्ते होते. मला पैसे देण्याची गरज नाही. मी कायम लोकात असतो. भुमरेंनी अंगणवाडीच्या महिलांना सक्तीने बोलावले, पण मला पैशांची गरज नाही. सभेचे पत्र फेब्रुवारीचे आहे. किती खोटारडेपणा करीत आहात, असा आरोप त्यांनी केला.

ठाकरे जाब विचारतील

भुमरे म्हणाले, आता अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुम्ही कितीही अफवा सोडा, क्लिपा सोडा, पण पायाखालची वाळू सरकली. यांनी मीडियात खुर्च्या रिकाम्या दाखवल्या. पन्नास काय लाखाच्या पुढे जनता आली. उद्धव ठाकरे आता खैरे आणि अंबादास दानवेंना जाब विचारतील.

आम्ही विकत नसतो...

अंबादास दानवेवर टीका करताना भुमरे म्हणाले की, आमचा तालुका स्वाभिमानी आहे. कुणीच कुणाच्या नाश्त्यावर बसलेलो नाही. एका कार्यकर्त्यांनी सांगावे की, संदीपान भुमरेंनी फसवले. आम्ही कधीही कुणाला लुबाडले नाही. नोकरीत पैसा घेतला नाही. अरे पन्नास खोक्यावर कॅबिनेट मंत्री विकत नसतो.

बातम्या आणखी आहेत...