आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुहूर्त नव्या वर्षातच:‘समृद्धी’ उद्घाटनाचा 1 मेचा मुहूर्त मजुरांअभावी हुकणार! होळीला गेलेले मजूर परतलेच नाहीत

औरंगाबाद / नामदेव खेडकर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 मे रोजी शिर्डी-नागपूर वाहतुकीचे होते नियोजन

राज्यातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर हुकण्याच्या मार्गावर आहे. होळीसाठी आपापल्या राज्यात गेलेले कामगार कोरोनाच्या धास्तीने परत आलेच नाहीत. त्यामुळे काम रेंगाळले. आज नागपूर ते शिर्डीपर्यंत ७० टक्के काम पूर्ण आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आता हे काम पूर्ण होण्यास २०२२ चे वर्ष उजाडेल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.

नागपूर ते मुंबई हा सहापदरी महामार्ग आहे. नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मार्गाची हवाई पाहणी केली होती. तसेच काही ठिकाणी या मार्गावरच हेलिकॉप्टर उतरवून अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. त्या वेळी कामाची प्रगती पाहून ठाकरे यांनी महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे २०२१ रोजी नागपूर ते शिर्डीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिल्या होत्या. त्यानुसार रस्ते विकास महामंडळानेदेखील कंत्राटदार कंपन्यांना मनुष्यबळ व यंत्रणा वाढवून वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

कर्जावर व्याज झाले सुरू, महसूलही आता लांबला
या महामार्गासाठी राज्य शासनाने कर्ज काढले आहे. या कर्जाचा हप्ता सुरू झालेला नसला तरी व्याज मात्र सुरू आहे. त्यामुळे तातडीने मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला तर टोलरूपी महसूल सुरू होईल आणि कर्ज व व्याजाची परतफेड सुरू होईल, या आशेने राज्य सरकारही हा प्रकल्प वेळेआधी पूर्ण करण्याच्या तयारीत होते. मात्र, कोरोनामुळे समृद्धीचे उद्घाटन लांबणीवर पडले.

बातम्या आणखी आहेत...