आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाची पार्श्वभूमी व लॉकडाउन मुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे . लॉकडाउन मधील ऑनलाइन शिक्षणामुळे थेअरी व प्रॅक्टिकल ही विद्यार्थ्यांचे होऊ शकलेले नाहीत . असे असतानाही महाराष्ट्र सरकारने एमबीबीएस चा परीक्षा 7 डिसेंबर पासून घेण्याचे घोषीत केले आहे. या नियोजित परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलाव्या याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना अभाविपने पाठवले आहे.
याबाबतची माहिती देताना अभाविपचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले की, राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने (NMC) दिनांक 25 नोव्हेंबर रोजी निर्देश जारी केले आहेत की, की 1 डिसेंबर पासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावीत. या महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण करून फेब्रुवारी 2021 मध्ये एमबीबीएसच्या परीक्षा घेण्यात याव्यात. एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम व राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (NMC) निर्देशाप्रमाणे महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असे स्वप्नील बेगडे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.