आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीए क्रिकेट स्पर्धा:शुभम जाधव, राहुल देशमुखच्या शतकाने हिंगोलीचा विजय

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित वरिष्ठ निमंत्रितांच्या लीग स्पर्धेत शुभम जाधव (120) व राहुल देशमुख (114) यांच्या शतकच्या जोरावर हिंगोली संघाने यजमान छत्रपती संभाजीनगरच्या संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय मिळवला. दोघांतील हा सामना बरोबरी राहिला.

जिल्हा संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हिंगोलीने पहिल्या डावात 35.5 षटकांत सर्वबाद 156 धावा काढल्या. प्रत्युत्तरात कर्णधार स्वप्निल चव्हाणच्या (50) अर्धशतकाच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर संघाचा पहिला डाव अवघ्या 139 धावांवर संपुष्टात आला. संघ 17 धावांवर पिछाडीवर पडला. संघातील केवळ तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. स्वप्निल चव्हाणने 36 चेंडूंत 9 चौकारांसह सर्वाधिक 50 धावा काढल्या. ओंकारने 24 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार मारत 37 धावा केल्या. ऋषिकेश कुंडे 15 धावांवर परतला.

हिंगोलीच्या दुसऱ्या डावात 380 धावा

हिंगोलीने दुसऱ्या दिवशी 1 बाद 91 धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. संघाने 102 षटकांत सर्वबाद 380 धावा उभारल्या. डावात 397 धावांची आघाडी घेतली होती. सलामवीर शुभम जाधवने 164 चेंडूंत 17 चौकारांसह 120 धावांची कर्णधारपदाला साजेशी शतकी खेळी केली. राहुल देशमुखनेही शतक झळकावले. त्याने 208 चेंडूंत 14 चौकार खेचत 114 धावा काढल्या. प्रतिक बोधगिरेने 20, समर्थ निकमने 22, अभिनव कांबळेने 18 धावा केल्या. छत्रपती संभाजीनगरकडून कार्तिक बालय्या, ओंकार, स्वप्निल चव्हाण यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.

छत्रपती संभाजीनगरच्या 73 धावा

प्रत्युत्तरात 397 धावांचा पाठलाग करताना औरंगाबादने दिवस अखेर 1 बाद 73 धावा केल्या. यात शेख मुकीमने 21 धावा केल्या. आकाश बोराडेने अर्धशतक झळकावले. त्याने 30 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारासह 50 धावा केल्या. अभिनव कांबळेने एकमेव बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...