आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न:मी पालकत्वाच्या भूमिकेत, तुम्ही माझ्याशी चर्चा करा : जिल्हधिकारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल कर्मचारी संघटनांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची तक्रार केली हाेती. तसे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रकाशित हाेताच रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांशी दोन तास चर्चा केली. मी पालकत्वाच्या भूमिकेत आहे. तुमच्या अडचणींविषयी माझ्याशी चर्चा करा, असा सल्ला दिला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनच्या बाजूच्या हॉलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले हाेते. दुपारी १२ वाजता कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आले. सुटीच्या दिवशी बैठक घेऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांना तुमच्या काय अडचणी आहेत ते सांगा, अशी विचारणा केली.

बातम्या आणखी आहेत...