आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्‍वासन:वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करणार, वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे खासदार ॲड. सातवांना आश्‍वासन

हिंगोली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमित देशमुख - Divya Marathi
अमित देशमुख
  • शासनाकडून वैद्यकिय परिक्षांबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे 50 हजार विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय शाखेचे परिक्षा घेणे धोक्याचे असून या परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी खासदार ॲड. राजीव सातव यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन देशमुख यांनी दिले आहे.

या संदर्भात खासदार ॲड. सातव यांनी वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा संदर्भात पत्राद्वारे सुचना मांडली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आता वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या परिक्षा असून राज्यभरातून सुमारे 50 हजार विद्यार्थी या परिक्षेला बसणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत या परिक्षा घेणे धोक्याचे आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता या परिक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी खासदार ॲड. सातव यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. या संदर्भात त्यांनी ट्विटर वरूनही या संदर्भातील मागणी केली आहे.

यावर मंत्री देशमुख यांनी या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. संबंधित विभागांना विश्‍वासात घेऊन परिक्षा बाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासनही देशमुख यांनी दिले आहे. त्यामुळे आता शासनाकडून वैद्यकिय परिक्षांबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे 50 हजार विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...