आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, यवतमाळ या चारही सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा स्वतंत्र आढावा घेतला. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि लातूरचे हॉस्पिटल पीपीपीच होणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.महाजन यांनी प्रत्येक अधिष्ठातांसोबत १० मिनिटे चर्चा केली. किती पदे भरलेली आहेत, किती आणखी भरावी लागणार आहेत, रोजची ओपीडी किती आहे, किती रुग्णांवर उपचार करण्यात आले याची माहिती त्यांनी घेतली. घाटी प्रशासनाने आम्हाला ७६ नर्स, तांत्रिक विभागातील १५ पदे आणि ४ डॉक्टर दिल्यास आम्ही पूर्ण ताकदीने हे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चालवू शकतो, असे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पीपीपीच्या या निर्णयाबाबत खासदार इम्तियाज जलील ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले की छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगीकरणाचे सातत्याने प्रयोग केले जात आहेत. यापूर्वीचे सर्व प्रयोग अयशस्वी झाले असूनही लोकप्रतिनिधींच्या स्वार्थासाठी हा प्रकार केला जात आहे. याविरोधात जनआंंदोलन उभारावे लागणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याला विरोध करायला हवा. त्यांच्या नेतृत्वाखाली विरोध करण्यास आम्ही एकत्र येऊ.
छत्रपती संभाजीनगर, लातूरचे हॉस्पिटल पीपीपी होणार आढावा घेतल्यानंतर दोन तास बैठक झाली. त्यामध्ये चारही सुपर स्पेशालिटीमधील कोणीही अधिकारी नव्हते. वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर हे दोन्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपीच्या माध्यमातूनच चालवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.