आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध उपक्रम:लायन्सकडून 40 हजार लोकांना वैद्यकीय मदत ; पदाधिकाऱ्यांनी दिली कार्याची माहिती

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. प्रामुख्याने आरोग्य आणि भूक भागवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये लायन्स क्लबच्या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून १५ हजार जणांवर उपचार झाले. आय हॉस्पिटलमध्ये दरवर्षी २५ हजार जणांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय हंगर फर्स्टच्या माध्यमातून १५०० गरजूंची भूक भागवली जाते. २१० देशांत साडेतेरा लाख सदस्य लायन्ससाठी काम करतात. लायन्सची ध्येयधोरणे आणि उद्दिष्ट समजावून सांगणाऱ्या सप्तस्वर कार्यक्रमात नव्या सदस्यांना लायन्सची माहिती देण्यात आली. या वेळी ७० नव्या सदस्यांची उपस्थिती होती.

प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, माजी प्रांतपाल तनसुख झांबड, राहुल औसेकर, मोरेश्वर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम सात झोनच्या अध्यक्षांनी मिळून आयोजित केला होता. औरंगाबादेत लायन्सचे २० क्लब आहेत. यामध्ये १४०० ते १५०० सदस्य आहेत. दरवर्षी १०० ते १५० नवे सदस्य जोडले जातात. संघटनात्मक चार्ट याबाबतही मार्गदर्शन केले. राहुल औसेकर यांनी युअर क्लब, युअर वे, युअर रोल यावर मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...