आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडाविश्व:मेडिको टी- 20 चॅम्पियनशिप : एनजे व्हिक्टर्स, आयकॉन संघाचा शानदार विजय

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडिको टी-२० चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी एनजे व्हिक्टर्स आणि आयकॉन संघाने शानदार विजय मिळवला. एमआयटी मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात सामन्यात व्हिक्टर्सने सुयोग स्ट्रायकर्स संघावर ८ गडी राखून मात केली. या लढतीत इम्रान पटेल सामनावीर ठरला.

प्रथम फलंदाजी करताना सुयोग स्ट्रायकर्सचा डाव १९.३ षटकांत १०७ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात एनजे व्हिक्टर्सने ८.४ षटकांत २ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर मशुद्दुल सईदने १६ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचत २३ धवा केल्या. दुसरा सलामीवीर इम्रान पटेलने फटकेबाजी करत १७ चेंडूंत ८ चौकार व २ षटकार लगावत ४६ धावा ठोकल्या. मयुरने त्याला बाद केले. कय्युमने १८ चेंडूंत ३ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचत नाबाद ४२ धावांची विजयी खेळी केली. सुयोगकडून मयुर जे. आणि संतोष बनकरने प्रत्येकी एक गडी बाद केला.

तत्पूर्वी, सुयोग स्ट्रायकर्सकडून संथ फलंदाजी केली. त्याचा फटका त्यांना बसला. सलामीवीर राजेश चौधरीने १२, अविनाश मुकेने २६, मयुरने १७ आणि लक्ष्मण सूर्यवंशीने १६ धावा काढल्या. व्हिक्टर्सकडून वाजेद सिद्दिकीने ३, मशद्दुल सईदने २ आणि इम्रान पटेलने २ गडी बाद केले.

आयकॉनने गायत्री संघाला हरवले

दुसऱ्या सामन्यात कर्णधार मो. आमेरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयकॉन संघाने गायत्री संघावर ३८ धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना आयकॉनने २० षटकांत ५ बाद १९५ धावा उभारल्या. यात शेख सोहिलने २७, अस्लम खानने २२, अल्ताफ शेखने ३३, कर्णधार मो. आमेरने २४, शेख वसिमने नाबाद २८ व संजय बनकरने नाबाद २५ धावा काढल्या. गायत्रीकडून रणजीने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात गायत्री संघ २० षटकांत ८ बाद १५७ धावा करू शकला. यात गणेश पाटीलने सर्वाधिक नाबाद ३७ व मनोज ताजीने २३ धावा केल्या. सईद शाहेद हुसेन व मो. आमेरने प्रत्येकी ३ गडी बाद केले.