आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्माचे विज्ञान:सिरोटोनिन हार्मोन वाढवते ध्यान, तेच शांतता प्रदान करते

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले वेद-पुराण मानतात- धारयति इति धर्म: म्हणजे जो धारण करण्यास योग्य आहे, तोच धर्म. तो आपल्यापेक्षा वेगळा नाही, तर आपल्या जीवन पद्धतीचा भाग आहे. भारतात धर्माचा प्रभाव सायकोसोमेटिक मानला आहे म्हणजे मन आणि शरीर दोन्हींशी जोडलेला आहे.

अध्यात्माचेही दोन पैलू आहेत. एक ध्वनीशी जोडलेला आहे, त्याला नाद म्हणतात आणि दुसरा दृश्याशी, त्याला ज्योती म्हणतात. मंदिर आणि मूर्ती दृश्याशी जोडलेले आहेत, तर प्रार्थना आणि भजन ध्वनीशी. ही दोन्ही माध्यमे प्राथमिक स्तरावर बाह्य ब्रह्मांडाला अातून जोडतात. जसजसे ध्यान उन्नत होत जाते, प्रार्थना मंत्रांचे रूप घेते आणि ध्वनी व ज्योती एक होतात. या योगाला नादब्रह्म किंवा ज्योतिब्रह्म म्हणतात. त्यामुळे शिवाची ओंकाराचा ध्वनी आणि प्रकाशाचा स्तंभ किंवा ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा होते.

आध्यात्मिक उपक्रमांमुळे आपल्या मेंदूशी संबंधित बिंदू सक्रिय होतात, त्यामुळे सिरोटोनिन हार्मोनची पातळी वाढते आणि आपल्याला शांतता आणि आनंदाची जाणीव होते. सिरोटोनिनचे प्रमाण जेव्हा कमी होते तेव्हा नैराश्य आणि तणाव निर्माण होतो.मेडिटेशन, योग किंवा ध्यानधारणेमुळे मिळणाऱ्या शांततेच्या जाणिवेचे कारण वैज्ञानिकृष्ट्या समजून घेता येऊ शकते. शरीरातील सर्व नसा मेंदूच्या ज्या भागाशी जोडल्या जातात त्याला एमिगडाला किंवा हिपोकॅम्पस म्हणतात. मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागातील संतुलनामुळे अनेक नसा रिलॅक्स होतात, त्यामुळे कुठे ना कुठे आपली जनुकेही प्रभावित होतात. त्याचा परिणाम असा होतो की, शरीराला आराम वाटतो, रक्तदाब आणि तणाव कमी होतो आणि एकाग्रता किंवा ध्यान उत्तम लागते. जेव्हा नसा या प्रक्रियेतून वारंवार जातात तेव्हा आपल्या जनुक स्तरावरही सकारात्मक बदल होतो. ते हार्वर्डच्या संशोधनातही सिद्ध झालेले आहे.

बातम्या आणखी आहेत...