आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यात १४४ शाळा निजामकालीन शाळा असून त्यांच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी शासनाकडे १९ कोटी ८ लाखाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास संदर्भात उद्या गुरुवारी (दि.९) सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून यावर अंतिम निर्णय होणार असून, त्यासाठी १९ कोटी ८ लाख रुपयांचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली.
निजामकालीन शाळा हा ऐतिहासिक वारसा असल्याने त्यादृष्टीने यश शाळा आणि शाळांचे संवर्धन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जानेवारीत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला अंतिम स्वरूप मिळाले असून गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. जिल्ह्यात २ हजार ७३१ प्राथमिक शाळा असून यातील १४४ शाळा या निजामकालीन शाळा आहेत. यातील ८४ शाळा या मोडकळीस आलेल्या आहेत.
यामध्ये १७३ वर्गखोल्या या पूर्णपणे मोडकळीस आलेल्या असून यांचे नव्याने बांधकाम करावी लागणार आहे. तसेच ३१५ वर्ग खोल्या यांची किरकोळ दुरुस्ती करण्याची गरज आहे. यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून यासाठी १९ कोटी ८ लाखाचे प्रस्तावाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या समोर नीलेश गटणे करणार आहेत. दरम्यान हे सर्व काम सर्व शिक्षण विभागाच्या अंतर्गत होणार असल्याचे गटणे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.