आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी प्रश्वावर विभागीय आयुक्तांची बैठक:औरंगाबादमधील अवैध नळ कनेक्शनाबाबत गुन्हे दाखल करा; अन्यथा अधिकाऱ्यावर कारवाई करणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमधल्या पाणी प्रश्वावर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बैठक घेत मनपा आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अवैध नळ कनेक्शन शहरात किती आहेत याचा सर्वे करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले आहेत. 30 जूनपासून शहरात सर्वत्र ही मोहीम वेगाने सुरु करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले आहेत.याबाबत ज्यांनी अवैध नळ कनेक्शन घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचनना देण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई नाही केल्यास अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात येणार असल्याचा इशारा केंद्रेकर यांनी दिला आहे.

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी पाण्याच्या प्रश्नावर सोमवारी संध्याकाळी आढावा बैठक घेतली. यावेळी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख हेमंत कोल्हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग उपायुक्त शिवाजी शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

तर अधिकाऱ्यांचे निलंबन करणार

शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतांना मनपाकडून फारशी कारवाई होत नाही.शहरात किती अवैध नळ कनेक्शन आहेत याची माहिती केंद्रेकरांनी

विचारली असता मनपाच्या अधिकाऱ्यांना त्याचे उत्तरही त्यांना देता आले नाही. याबाबतची माहिती तातडीने देण्याचे आदेश त्यांनी मनपाला दिले आहेत. शहरात प्रश्न गंभीर असतांना अवैध नळ कनेक्शन बाबत कडक कारवाई का होत नाही. लोकांना अशीच सवय राहिली तर नव्या पाईपलाईनवरही अवैध नळ कनेक्शन घेतले जातील. त्याना कोणाचीही भिती वाटणार नाही..त्यामुळे अवैध नळ कनेक्शन घेणाऱ्यावर गुन्हे दाखल करा.अधिकाऱ्यांना अवैध नळ कनेक्शन माहीत नाहीत हे शक्य नाही. त्यामुळे त्या लोकावर गुन्हे दाखल नाही केल्यास अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...