आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akbaruddin Owaisi's Meeting, Will Address In A Short Time, Pay Attention To What He Will Say!

औरंगाबादेत ओवैसींची शाळा:राज ठाकरेंवर केली तिखट टीका; म्हणाले -कुणी कुत्र्यासारखे भुंकत असेल तर भुंकू द्या!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाचा काळ येतो कुणी कुत्र्यासारखे भुंकत असेल तर त्यांना भुंक द्या, कुत्र्यांचे काम भुंकणे आहे, वाघाचे काम शांतपणे पुढे जाण्याचे आहे. अशी जहरी टीका ​​​​​​एमआयएम नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

भुंकणाऱ्यांच्या जाळ्यात फसू नका. ते तुम्हाला फसवण्याचे काम करीत आहेत त्यांना उत्तर न देता हसुन पुढे जा असेही ओवैसी म्हणाले. मी औरंगाबादेत कुणालाही उत्तर देण्यासाठी आलो नाही, त्यांची लायकीच नसताना मी त्यांना उत्तर कशाला देऊ असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. अकबरुद्दीन ओवैसी तेलंगाणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष असून, याच माध्यमातून ते औरंगाबादमध्ये एक शाळेची उभारणी करण्यात आले आहेत. भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांची औरंगाबादेत सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

सर्व धर्मीयांच्या योगदानाने आणि क्रांतीनेच राष्ट्रनिर्मिती होते. मुस्लिम समाज देशात सर्वात मागासलेला असून मी त्यांना पुढे नेण्याचे कामच करीत आहे. आमच्या शैक्षणिक संस्थेत हिंदुधर्मीयांसह सर्वच धर्मांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असल्याचे अकबरुद्दीन म्हणाले.

औरंगाबाद अल्लाची भूमी

औरंगाबाद ही अल्लाची भूमी आहे. आपल्या हक्काची लढाई लढा. तुम्हाला कुणालाही उत्तर द्यायचे नाही, आम्ही उत्तर देऊ पण कायदा हातात घेऊ नका. प्रत्येकाचा काळ येतो कुणी कुत्र्यासारखे भोकले तरी त्यांना भोकु द्या, कुत्र्यांचे काम भोकणे आहे वाघाचे काम शांतपणे पुढे जाण्याचे आहे. त्यांच्या जाळ्यात फसू नका. ते तुम्हाला फसवण्याचे काम करीत आहेत. त्यांना उत्तर न देता हसुन पुढे जा असेही ओवैसी म्हणाले.

मी कधीच तुम्हाला विसरणार नाही

अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, कोरोनाचा काळ कठीण होता, त्यानंतर आम्ही लोकांना साद दिली. आज साऱ्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांनी आम्हाला साथ दिली आणि औरंगाबादेत एक शैक्षणिक संस्थेची पाळमुळे रुजत आहेत याचा अभिमान वाटतो असेही ओवैसी म्हणाले.

''मला महाराष्ट्रातील कोणताच मुस्लिम विसरणार नाही. मी तुम्हाला विसरलो नाही ना विसरणार नाही. मी असा माणूस आहे की, माझ्यासाठी कुणी खस्ता खाल्ल्या तर मी त्यांना आयुष्यभर विसरत नाही. औरंगाबादेत शैक्षणिक संस्था उभारत असल्याचा अभिमान वाटतो, ज्यांनी मला या कार्यात साथ दिली त्यांचा मला अभिमान वाटतो'' अशा भावनाही अकबरुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ''एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी हे केवळ भाषणच करीत नाही तर गरीबांच्या राशनचाही विचार करतात.''

नव्या वादाला फुटले तोंड

खुलताबाद येथे त्यांनी आज दुपारी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतले त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले असून त्यांच्यावर टीकाही होत आहे. या सभेत ते या टीकेला उत्तर देण्याचीही शक्यता आहे.

एमआयएमच्या वतीने त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी त्यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली आहे. खुल्ताबादहून औरंगाबादकडे येत असताना पडेगाव भागात हा अपघात झाला आहे. दुचाकी चालकाची अकबरुद्दीन ओवैसीकडून विचारपूस करण्यात आली आहे. मशिदीवरील भोंग्याबाबात तापलेल्या राजकारणावरती आमदार अकबरुद्दीन ओवैसी नेमकं काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सभेपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुलत्ताबादमधील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. तसेच त्या कबरीवर फुले वाहून प्रार्थना देखील केली. त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल, माजी आमदार वारिस पठाण हे देखील उपस्थित होते.

धार्मिक स्थळांना दिल्या भेटी

अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगाबादमध्ये आल्यानंतर विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की परिसरातील हजरत सय्यद शाह दर्ग्यालाही त्यांनी भेट देत दर्ग्यावर चारद चढवली. त्यांनतर त्यांनी खुल्ताबादेतील औरंगजेबच्या कबरीलाही भेट दिली.

2015 केली होती शाळेची घोषणा

2015 च्या महानगर पालिका निवडणुकीदरम्यान हैदराबादच्या धर्तीवर शहरात भव्य शाळा उभारण्याची घोषणा एमआयएमने केली होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी या शाळेच्या भूमिपुजनाला मुहूर्त सापडले आहे. हिमायत बागेच्या शेजारी असलेल्या दोन एकर जागेवर पाच मजली शाळेची इमारत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...