आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेकडून नागरिकांना मोठा दिलासा:मेल्ट्रॉनचे हॉस्पिटलमध्ये 15 दिवसांत सुरु होणार शस्त्रक्रिया विभाग

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोव्हिड काळात अनेकांसाठी आधार बनलेल्या मेल्ट्रॉन हॉस्पीटलमध्ये आता नियमीतपणे ओपीडी सुरु आहे. पुढील १५ दिवसात या ठिकाणी शस्त्रक्रिया आणि प्रसुतीची व्यवस्था देखील सुरु होणार आहे. अशी माहीती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा यांनी दिली.

मेल्ट्रॉन मधील ऑपरेश थिएटरचे काम पूर्ण झाले आहे. फक्त आता निरजंतुकीकरणाचे प्रमाणपत्र मिळाले की या ठिकाणी पुढील काम सुरु होईल. यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागले. पहिल्या टप्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, हारणीया, अँपेडिक्स अशा छोट्या शस्त्रक्रीया होतील. याच दरम्यान या हॉस्पीटलसाठी स्वतंत्र स्त्रीरोग तज्ञ आणि सर्जन नेमण्याचे काम पूर्ण होईल त्या नंतर मोठ्या शस्त्रक्रिया या ठिकाणी होतील असे मंडेलचा यांनी सांगितले. सध्या या ठिकाणी तीन मजले असून ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय सिटी स्कँन ,एक्स रे मशीन सुद्धा उपलब्ध आहेत. शहरातील नागरिकांना अल्पदरात या सुविधा मिळणार आहे. मनपा वैधकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मांडलेचा व इतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी ४ ऑगस्ट रोजी पूर्ण झालेल्या कामाची पहाणी केली.

या ठिकाणी सुद्धा होणार सुविधा

शहरातील नेहरु नगर, कैसर कॉलनी आणि एन ११ येथील आरोग्य केंद्रातील समस्या सोडवल्या जातील. यासाठी संबधित विभागांशी पत्र व्यवहार देखील करण्यात आला आहे. या ठिकाणी देखील शस्त्रक्रीया, विविध प्रकारच्या चाचण्या आणि प्रसुतीगृह सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. पारस मंडेलचा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...