आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना रॅपिड अँटिजन चाचण्यांची सक्ती केली जात असल्याने शासनाच्या तिजोरीवर भार पडत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कोविड - १९ चाचण्यांसाठी पद्धती निश्चित केली आहे. २१ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून इंडियन कैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या केल्या जाव्यात असे निर्देश दिले आहेत.
कोरोनाची लक्षणे नसलेले प्रवासी, व्यापारी, जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्ती यांची कोणतीही चाचणी केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकात दिल्यामुळे प्रशासनाकडून चाचण्यांसाठी होत असलेली सक्ती थांबेल का, हा खरा प्रश्न आहे. आयसीएमआरच्या सूचनांनुसार ज्या व्यक्तींना उपचारासाठी त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे त्यांची अँटिजन चाचणी करावी. जेणे करून अर्ध्या तासांत अशा रुग्णांवर उपचार सुरू करता येतील. तसेच मृत व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या महिला, ऑपरेशन करावयाचे रुग्ण यांची यांची ट्रू नॅट चाचणी करावी. ही सुविधा नसेल तर अँटिजन चाचणी करावी. अॅन्टिजन चाचणी नकारात्मक असल्यास आणि अशा रुग्णांत लक्षणे असतील, बाधित व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या रुग्णांची तसेच परदेशातून आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे सूचवले आहे.
विनाकारण चाचण्या करण्यास मनाई
शासनाच्या परिपत्रकात प्रवास करणाऱ्या व्यक्ती, जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्ती, व्यापारी यांची कोविड -१९ ची लक्षणे नसल्यास त्यांची चाचणी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
अनेक चाचण्यांना मनाई
राज्य शासनाच्या परित्रकात म्हटले आहे की, अनेक जिल्ह्यांत एकाच रुग्णाची २ ते ३ वेळा चाचणी केली जात आहे. या मुळे प्रयोगशाळांवरील ताण तर वाढतोच शिवाय शासनाचा आर्थिक भारही वाढत आहे. त्यामुळे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचणी करावी. अधिकच्या चाचण्या करू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे मराठवाड्यात स्थिती
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांवरून रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यासाठी सेंटर्स उभारण्यात आली आहेत. बहुतांश जिल्ह्याच्या िजल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी, दुकानदारांना कोरोना चाचणी केल्याशिवाय दुकाने, प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नसल्याची तंबी दिली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत व्यापाऱ्यांनी रांगा लावून कोरोना चाचण्या करून घेतल्या. यात सर्वाधिक अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे.
परभणीत चाचणीसाठी २५ ची डेडलाईन
परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी २५ ऑगस्टपूर्वी रॅपिड अँटिजन टेस्ट करून घ्यावी, अन्यथा त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत, असा इशारा महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे. चाचणीसाठी शहरातील १६ ठिकाणी सेंटर उभारण्यात आले. या ठिकाणी आतापर्यंत ९ हजार ३३७ करण्यात आल्या. त्यातील आठ हजार ९०२ जणांचा निगेटिव्ह अहवाल आला तर ४३५ जण पॉझिटिव्ह आढळले.
हिंगोली जिल्ह्यात ५७०० अँटिजन चाचण्या
हिंगोलीसह जिल्हाभरात व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाने अॅन्टिजन चाचणी बंधनकारक केली होती. आतापर्यंत ५७०० व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २०१ व्यापारी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागाने सर्व व्यापाऱ्यांना बाजारपेठ उघडण्यासाठी रॅपिड चाचण्या बंधनकारक केल्या होत्या. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले . ट्रू नॅट चाचणी करावी. ही सुविधा नसेल तर अँटिजन चाचणी करावी. अॅन्टिजन चाचणी नकारात्मक असल्यास आणि अशा रुग्णांत लक्षणे असतील, बाधित व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या रुग्णांची तसेच परदेशातून आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे सूचवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.