आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारी शहर व परिसरात ९९४.१ हेक्टोपास्कल कमी हवेचा दाब निर्माण झाला होता. राजस्थान, गुजरात, कच्छ प्रदेशातील उष्ण व कोरडे वारे वेगाने आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ते पोषक ठरले.
या उष्णतेच्या लाटेने रविवारी ४०.२ अंशांवर असलेले कमाल तापमान ३ अंशांनी वाढून सोमवारी यंदाच्या मोसमात प्रथमच ४३.२ अंश उच्चांक पातळीवर पोहोचले. सर्वात उष्ण दिवस म्हणून चिकलठाणा वेधशाळेने नोंद घेतली आहे. दिवस-रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढ झाली आहे.
मंगळवारी तापमान ३९ अंशादरम्यान राहील. एप्रिलमध्ये २७ दिवस ४० ते ४२.४, तर मेचे ८ दिवस ४० ते ४१.५ अंश सेल्सियस तापमान राहिले. वाळवंटी भागातून उष्ण वारे वेगाने वाहून आल्याने ९ मे रोजी तापमान ४३.२ अंशांवर गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.