आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंतांचा सत्कार:ब्राह्मण पुरोहित संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार ; संस्कार शिबिराची माहिती

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मण पुरोहित संघटनेतर्फे दहावी, बारावी वर्गातील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा “कौतुकाची थाप’ या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पालकांचाही सत्कार करण्यात आला. तसेच वैदिक शिक्षणाबरोबर महाविद्यालयीन शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या वैदिक विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार झाला. गारखेडा परिसरातील आजूबाई मंदिराच्या सभागृहात १९ जून रोजी हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित दुर्गादास अंबादास मुळे गुरुजी, प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी दाशरथे, ऋषिकेश जोशी यांची उपस्थिती होती.

या वेळी अश्विनी दाशरथे यांनी करिअरविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महेश देशपांडे यांनी वह्या वाटप केल्या. प्रास्ताविक अनंत पांडव यांनी केले, तर सूत्रसंचालन मयूरी संतोष पटवर्धन व श्रावण रमेशराव फडे यांनी केले. गणेश जोगलादेवीकर यांनी आभार मानले तसेच संघटनेतर्फे येत्या काही आठवड्यांत संस्कार शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश जोशी, पवन जावळे, अक्षय तांदुळजे, अनंता मोरे, काळे गुरुजी, पद्मनाभ चौधरी, राजू जामखेडकर, संतोष पटवर्धन यांनी सहकार्य केले.

कमी टक्के मिळाले म्हणून हताश होऊ नका : जोशी

स्पर्धा परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न ऋषिकेश जोशी यांनी केला. ते म्हणाले, “कमी टक्के मिळाले म्हणून या परीक्षा आपण देऊ शकत नाही, असे नसून स्पर्धा परीक्षेत सातत्य आणि अभ्यास या गोष्टीचा समतोल राखला तर यश नक्की मिळते’ असा सल्ला त्यांनी स्वतःचा अनुभव सांगत विद्यार्थांना दिला.

बातम्या आणखी आहेत...