आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचा दणका:सुमारे अडीच लाख चुकीचे रीडिंग घेणाऱ्या 6 वीज मीटर एजन्सी बडतर्फ, कंत्राटदारांमध्ये औरंगाबादच्या एजन्सीचाही समावेश

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुमारे अडीच लाख घरांचे चुकीचे वीज मीटर रीडिंग घेऊन ग्राहकांना मनस्ताप देणाऱ्या राज्यातील ६ एजन्सींविरोधात महावितरणने बडतर्फीची कारवाई केली आहे. यात पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यांना काळ्या यादीत टाकले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अचूक मीटर रीडिंग न घेणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी १ फेब्रुवारीला दिला हाेता. त्यानुसार एजन्सीने घेतलेल्या रीडिंगची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. यात बारामती परिमंडळामधील परिमल एंटरप्रायझेस, पांडरे ता. बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायझेस, सादलगाव ता. शिरूर (केडगाव विभाग), कल्याण परिमंडळामधील सुप्रीम पॉवर सर्व्हिसेस, अंधेरी (वसई विभाग), नांदेड परिमंडळामधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडळामधील नंदिनी एंटरप्रायझेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोला परिमंडळामधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सहकारी संस्था या एजन्सींचा समावेश आहे.

रीडिंग घेताना कामात कुचराई केल्याचा ठपका
वीज बिलासाठी रीडिंग घेतले जात असताना संबंधित एजन्सींच्या लोकांनी कामात कुचराई केली असल्याचा ठपका महावितरणने ठेवला आहे. रीडिंग घेताना संबंधित घराबाहेर बसवलेल्या मीटरचा फोटो बिलावर देणे आवश्यक असते. परंतु त्यात प्रचंड कुचराई करण्यात आल्याचे चौकशीत आढळले.

बातम्या आणखी आहेत...